अखेर रियानं ३ मोठी गुपितं उघड केली; एनसीबीसमोर दिली महत्त्वाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 20:49 IST
1 / 10सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी विभागानं त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक केली आहे. शोविकला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.2 / 10एनसीबीकडून सध्या शोविकसह रियाचीही चौकशी सुरू केली आहे. आज जवळपास सहा तास रियाची चौकशी करण्यात आली. तिला उद्याही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.3 / 10सुशांतच्या घरात काम करणाऱ्या दिपेश सावंतनं रियाविरोधात जबाब दिल्यानं तिच्या अडचणी वाढल्या आहेत. रियानं आज दिलेल्या जबाबात तीन महत्त्वाची गुपितं उघड केली.4 / 10शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडानं एनसीबी चौकशीत रियाचं नाव घेतलं. यानंतर आज एनसीबीनं रियाची चौकशी सुरू केली. १७ मार्चला सॅम्युअल मिरांडा अंमली पदार्थ आणण्यास गेला होता. त्याची कल्पना मला होती, असं रियानं आज एनसीबीच्या पथकाला सांगितलं.5 / 10सॅम्युअल अंमली पदार्थ आणण्यासाठी जैदकडे गेला होता. त्यावेळी मी आणि शोविक अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या जैदच्या संपर्कात होतो, अशी कबुली रियानं दिली.6 / 10मी शोविकच्या माध्यमातून सुशांत राजपूतसाठी अंमली पदार्थ मागवायचे, असा जबाब रियानं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिला.7 / 10१५ मार्चला मीच शोविकशी अंमली पदार्थाबद्दल चॅटवर बोलत होते, असा कबुली जबाबदेखील रियानं दिला. 8 / 10शोविक सुशांतसाठी बासितकडून अंमली पदार्थांची खरेदी करायचा. बासितचं आपल्या घरीदेखील येणं-जाणं होतं, अशी माहिती रियानं दिली.9 / 10आज रिया चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात उशिरा पोहोचली. त्यामुळे तिची चौकशी पूर्ण झालेली नाही. उद्या पुन्हा तिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे.10 / 10रिया बऱ्याच प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे देत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रियानं आज उघड केलेल्या गुपितांमुळे उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो.