Join us

सुशांत सिंहच्या आत्महत्येआधीच विकिपीडियावर मृत्यूची वेळ अपडेट; पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 8:00 AM

1 / 11
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला आत्महत्या केली. नैराश्यातून त्यानं आपलं जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
2 / 11
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस सध्या अनेकांची चौकशी करत आहेत. अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला पोलिसांनी चौकशीला बोलावलं. याशिवाय अभिनेत्री संजना सांघीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.
3 / 11
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले.
4 / 11
सुशांत सिंहनं आत्महत्या करण्यापूर्वीच विकिपीडियावरील त्याच्या नावाचं पेज ८ वाजून ५९ मिनिटांनी एडिट करण्यात आलं होतं. सुशांतच्या आत्महत्येची माहिती याचवेळी अपडेट करण्यात आली.
5 / 11
सुशांतच्या आत्महत्येची बातमी दुपारच्या सुमारास आली. मग सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी विकिपीडिया पेज कोणी एडिट केलं? हे नेमकं कसं काय झालं? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे.
6 / 11
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी त्याचा रुम पार्टनर, घरातील कर्मचारी यांची चौकशी केली. त्यात सुशांत साडे नऊच्या सुमारास त्याच्या खोलीतून बाहेर आला होता. ज्युस पिऊन तो १० वाजता त्याच्या खोलीत परत गेला, अशी माहिती समोर आली.
7 / 11
सुशांत १० वाजता त्याच्या खोलीत गेला. मग सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी त्याच्या मृत्यूची माहिती विकिपीडियावर कशी काय अपडेट झाली, असा प्रश्न निर्माण झाला.
8 / 11
मुंबई पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकिपीडिया यूटीसी टाईमलाईन (युनिव्हर्सल टाईम कोऑर्डिनेटेड) फॉलो करतं. ही वेळ आंतरराष्ट्रीय मानक वेळेच्या साडे पाच तास मागे असते.
9 / 11
पोलिसांनी विकिपीडियावर करण्यात आलेल्या एडिटचा तपास केला. त्यात त्यांना पानावरील माहितीशी कोणतीही छेडछाड झाली नसल्याचं समजलं.
10 / 11
१४ जूनला सुशांतनं मुंबईच्या वांद्र्यातील घरात गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदनातून त्यानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
11 / 11
सध्या पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक प्रतिस्थापितांनी सुशांतला एकटं पाडण्यासाठी, त्याला चित्रपट मिळू नये यासाठी प्रयत्न झाल्याचे आरोप केले. त्यामुळे या प्रकरणात बॉलिवूडमधील मोठ्या प्रॉडक्शन हाऊससह अनेकांची चौकशी सुरू आहे.
टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती