Sushant Singh Suicide Case Sushant stopped taking meds in June first week says Dr Kersi Chavda
Sushant Singh Suicide Case: जूनच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय घडलं?; सुशांतच्या मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 9:51 AM1 / 10बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं अडीच महिन्यांपूर्वी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे.2 / 10सीबीआयचं पथक मुंबईत असून सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज यांची गेल्या आठवड्याभरापासून चौकशी करतंय. तर कालपासून सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीचीदेखील चौकशी सुरू झाली आहे.3 / 10सुशांत तणावाखाली होता. त्यातूनच त्यानं टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती सुरुवातीला समोर आली. पण सुशांतच्या वडिलांनी त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करून पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीचा ट्रॅक बदलला.4 / 10सीबीआयकडे तपास गेल्यापासून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यातच आता सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांनी जूनमध्ये घडलेल्या घडामोडी सांगितल्या आहेत.5 / 10तणावाखाली असलेला सुशांत डॉ. कर्सी चावडा यांच्याकडे उपचार घेत होता. सुशांतनं जूनच्या पहिल्या आठवड्यात औषधं घेणं थांबवलं असल्याचा चावडा यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.6 / 10सुशांतनं औषधं घेणं थांबवल्यानं त्याची प्रकृती गंभीर झाली. मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात चावडा यांनी ही माहिती दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. 7 / 10मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणात कर्सी चावडा यांच्यासह परवीन दादाचांजी, हरिश शेट्टी, निकिता शहा आणि सुसॅन वॉकर या पाच मानसोपचारतज्ज्ञांचे जबाब नोंदवले. सुशांत अतिशय तणावाखाली होता, अशी माहिती या सगळ्यांनी जबाबात दिली आहे.8 / 10सुशांतनं जूनच्या पहिल्या आठवड्यात औषधं घेणं थांबवलं. त्यामुळे त्याला पॅनिक ऍटॅक आला. तो सतत चिंतेत आणि तणावाखाली होता, अशी माहिती चावडा यांनी पोलिसांनी दिल्याचं सुत्रांनी सांगितलं.9 / 10चावडा यांचा जबाब समोर आल्यानं सुशांत तणावाखाली होता, हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. सुशांतनं तणावातून आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं होतं. 10 / 10रियानंदेखील नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमधून सुशांत अतिशय तणावाखाली होता, असा दावा केला आहे. रिया ८ जूनला वांद्र्यातील घरातून बाहेर पडली. त्यानंतर सुशांतनं १४ जूनला आत्महत्या केली. या आठवड्याभरात नेमकं काय घडलं, याचं गूढ उकलण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications