ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २८ - टीम इंडियाने रविवारी रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या 'विराट' विजयानंतर मॅसेंजिंग अॅप व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या नादी न लागण्याचे मेसेजेस फिरत आहेत. सोशल मिडिया फेसबुक, टि्वटरवर विजयाचा नायक असलेल्या विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असून, क्रिकेटमध्ये नव्या देवाचा उदय झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे. एकहाती सामना फिरवणारा विराट व्हॉटस अॅपवर बाहुबली बनला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेमाचा 'दी एन्ड ' झाला असला तरी, नेटीझन्स अजूनही अनुष्काला विसरले नसल्याचे मेसेजेसमधून दिसत आहे. भारताच्या वर्ल्डकप विजयापर्यंत विराटच्या कामगिरीत सातत्य टिकून रहावे म्हणून विराटला व्हॉटस अॅपवरच्या मेसेजेसमध्ये अनुष्कापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे. मागच्यावर्षी वर्ल्डकपस्पर्धेच्यावेळी विराटचा उत्साह वाढवण्यासाठी अनुष्का थेट ऑस्ट्रेलियात जाऊन पोहोचली होती. मात्र त्यानंतर विराटची कामगिरी उंचावण्याऐवजी ढासळली. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर तर, सोशल मिडीयावरुन अनुष्काची खिल्ली उडवणारे मॅसेजेस फिरत होते. त्यावेळी विराटने स्वत: हस्तक्षेप करुन अनुष्काला जबाबदार धरु नका असे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. भारताच्या विजयानंतर व्हॉटस अॅपवर फिरणारे काही गंमतीशीर मेसेज आणि फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार. एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको. ***ब्रेकिंग न्यूज***ऑस्ट्रेलियन पूर्ण टीम अनुष्का शर्माच्या घरी, वैनी तुम्ही मैच बघायला अलंच पाहिजेचा आग्रह............. Dhoni comes in 14th over Kohli : dhoni bhai, bahut run banaane hai Dhoni : abey run tereko banane hai. Mai to winning shot maarne aaya hu आस्ट्रेलियावालो कोपता नहीं है की#हम_इंडियावाले चाहे कितना भी#टारगेट हो#मार्च में पूरा कर हि देते है...#सही_है_ना___ T 2188 - @imVkohli you were brilliance times infinity !! Pure genius. Thank you for tonight ! And may many more such nights come our way !!— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 27, 2016Woooow @imVkohli ...special it was... Great win, fighting all the way! #IndvsAus— sachin tendulkar (@sachin_rt) March 27, 2016What a match! Proud of our team. Great innings @imVkohli & exemplary leadership @msdhoni .— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2016