Join us

CNG तुमच्या दारी! मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; एक कॉल करा अन् कारमध्ये गॅस भरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:36 AM

1 / 10
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे CNG वाहनांना मोठी मागणी आहे. आता सीएनजी वाहनचालकांना व्हीआयपी सुविधा मिळणार आहे. दिवस असो वा रात्र केवळ एका कॉलवर सीएनजी पंप तुमच्या घराजवळ येऊन वाहनात CNG गॅस भरणार आहे.
2 / 10
देशात प्रायोगिक तत्वावर या सुविधेची सुरूवात महाराष्ट्रातील मुंबईतून होत आहे. त्यामुळे CNG वाहनचालकांना गॅस भरण्यासाठी तासनंतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळही वाचणार आहे.
3 / 10
स्टार्टकंपनी Fuel Delivery ने मुंबईत CNG ची होम डिलीवरीसाठी महानगर गॅस लिमिटेड(Mahanagar Gas) सोबत एक करार केला आहे. त्या करारानुसार शहरात ठिकठिकाणा मोबाईल सीएनजी स्टेशन बनवले जातील.
4 / 10
हे मोबाईल सीएनजी स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास कार्यरत राहून CNG गॅसची डिलीवरी करणार आहेत. ही सुविधा सीएनजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा, कॅब, खासगी आणि व्यावसायिक वाहने, स्कूल बससह अन्य वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे.
5 / 10
स्टार्टअप कंपनी Fuel Delivery ने निवेदनात म्हटलंय की, या सुविधेची सुरूवात झाल्यानंतर वाहन चालकांना सीएनजी भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही. रांगेत वाट पाहण्याची वेळ येणार नाही. मुंबईत दोन ठिकाणी सीएनजी मोबाईल स्टेशन पंप सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे
6 / 10
पुढील ३ महिन्यात मुंबईत ही सुविधा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सायन आणि महापे याठिकाणी सीएनजी तुमच्या दारी येईल. त्यानंतर हळूहळू संपूर्ण शहरात त्याचा विस्तार केला जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे.
7 / 10
पेट्रोलियम आणि एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने पहिली चाचणी घेतली. चाचणीनंतरच सीएनजीच्या होम डिलिव्हरीला मान्यता देण्यात आली आहे. 'भारतात हे प्रथमच घडत आहे, जेव्हा एखादी स्टार्टअप कंपनी मोबाइल सीएनजी स्टेशन सुरू करणार आहे.
8 / 10
देशात डिझेलची होम डिलिव्हरी यशस्वी केल्यानंतर आता आम्ही आमच्या ग्राहकांना घरपोच सीएनजी पुरवणार आहोत असं कंपनीने सांगितले. एकट्या मुंबईत दरवर्षी ४३ लाख किलो सीएनजीचा वापर होतो. शहरात सुमारे ५ लाख सीएनजी वाहने धावतात.
9 / 10
मात्र मुंबईत केवळ २२३ सीएनजी स्टेशन आहेत. अशा परिस्थितीत मोबाईल सीएनजी स्टेशन सुरू झाल्याने लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे.
10 / 10
या सुविधेमुळे लोकांचा वेळही वाचणार असून सीएनजी वाहनांची लोकप्रियताही वाढणार आहे. कंपनी आगामी काळात ही सेवा इतर शहरांमध्ये वाढवू शकते असं सांगितले आहे.