Join us

The Kashmir Files: 'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 4:46 PM

1 / 9
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहेत. काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय असा चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं.
2 / 9
यात पल्लवी जोशी, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात काही राज्यात टॅक्स फ्री केला आहे.
3 / 9
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पल्लवी जोशी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, यांच्यासह द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी मुंबईत सिनेमा पाहिल्याचं ट्विट करुन सांगितलं.
4 / 9
सत्य हे सत्यच असतं, ज्यांनी ऐतिहासिक सत्य जाणून पुढच्या पिढीला सांगायचं नाही, तेच लोकं या चित्रपटाला विरोध करत आहेत. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट इतिहासाचं सत्य सांगतो.
5 / 9
या चित्रपटातून जम्मू काश्मीरचं सत्य सांगण्यात आलंय. हा चित्रपट इतिहासातील सत्य आणि तथ्यांवर आधारीत आहे. यातील घटना इतिहासाचं सत्य आहे, असेही फडणवीसांनी म्हटलंय.
6 / 9
“काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर मी स्तब्ध आणि निशब्द आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. काश्मीरचं सत्य चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं आहे.
7 / 9
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे.
8 / 9
पंतप्रधानांनी ३७० कलम हटवून देशात कोणती क्रांती आणली हे समजून घ्यायचं असेल काश्मीर फाईल्स पाहिला पाहिजे,” असं फडणवीस चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
9 / 9
विशेष म्हणजे फडणवीसांनी विधानसभेतही डंके की चोट पे.... असं म्हणत हा सिनेमा आम्ही पाहायला गेलो होते, असे म्हटले
टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcinemaसिनेमाJammu Kashmirजम्मू-काश्मीर