"Those" women should be ashamed, says Karuna Munde in the Urfi javed-Chitra Wagh controversy
"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 2:45 PM1 / 9सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 2 / 9दरम्यान, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यार रंगलेल्या या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या प्रतिक्रियेचीही आता चर्चा होत आहे.3 / 9उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादाबाबत चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, तुम्ही बघा हे सर्व महिला महिलांचंच चाललेलं आहे. 4 / 9आम्ही कुणी त्याच्यात भाग घेतला आहे का? आम्ही तर महिलांना संधी देतोय. परंतु संधी देत असताना त्या संधीचं सोनं करायचं की राख करायची, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.5 / 9उर्फी जावेद हिच्यावर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी तुफान टीका केली होती. तशातच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवल्याची माहिती दिली. 6 / 9चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केला, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार ही नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर म्हणाल्या. 7 / 9 त्यावर पुन्हा चित्रा वाघ यांनीही उत्तर दिले आहे. 'स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर..!' अशी निर्भिड प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. आता, या वादावर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.8 / 9राज्यात सध्या उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन जे प्रकरण सुरू आहे. त्या कपड्यांचा मी देखील विरोध करते. अर्धनग्न कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरणे ही वाईट गोष्ट आहे. ही सर्व महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. 9 / 9ज्या महिला उर्फी जावेदचे समर्थन करतात किंवा तिला पाठींबा देतात, त्यांना लाज वाटायला हवी. कारण, अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन त्या करत आहेत. अशा महिला बिनडोक आहेत, अशी टीका करुणा शर्मा मुंडे यांनी केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications