Today Gold Rate: Falling gold prices on the eve of Diwali; What is today's price ?, lets know!
Today Gold Rate: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 10:25 AM1 / 5आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. 2 / 5गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.3 / 5गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२४ रुपये आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications