Today Gold Rate: Gold prices fall, silver prices fall; What is today's price ?, lets know!
Today Gold Rate: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही झाला कमी; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 5:02 PM1 / 5एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना, सोन्याच्या दरांमध्ये मात्र काही दिवसांपासून घसरण नोंदवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव स्थिर आहेत. परंतु भारतीय बाजारांमध्ये काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे.2 / 5मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गेल्या काही दिवसांपासून सोन्यात काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात येत आहे. 3 / 5मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX)नूसार मुंबईत प्रतितोसोन्याचे दर 47,460 रुपये आहे. तर नवी दिल्लीत प्रतितोळा सोन्याची किंमत 50,950 इतकी आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications