Today Gold Rate: Gold prices fall, silver prices fall; What is today's rate ?, Find out!
Today Gold Rate: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही झाला कमी; काय आहे आजचा दर?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 4:14 PM1 / 5आगामी धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याची किंमतीत 09 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर हा 47,971 रुपये आहे.2 / 5चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 262 रुपयांनी घसरण झाली आहे. 0.40 टक्के घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 64,903 रुपये नोंद झाली आहे. 3 / 5दरम्यान, ऑक्टोबर 2020 नुसार गेल्या वर्षावर नजर टाकली तर सध्या तरी सोने 4 हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,220 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,971 रुपये आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications