A torrential downpour on the 'Express Way' in Mumbai since early morning
मुंबईत पहाटेपासूनच कोसळधारा, 'एक्सप्रेस वे'वर वाहनांची भली मोठी रांग By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:29 AM1 / 9 मुंबईत ९ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील तीन दिवस हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट जाहीर केला. त्यानंतर रविवारी त्यात बदल करून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. 2 / 9मुंबई, कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस न झाल्याने हा अलर्ट नागरिकांसाठी होता की पावसासाठी, अशी गमतीदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.3 / 9बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मोठ्या पावसामुळे रस्त्यावर आणि सखल भागातही पाणी साचलंय. 4 / 9रविवारी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता, हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ‘रेड ॲलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा रविवारी दिला. 5 / 9मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा होता. मात्र, पावसाचे ढग दिसलेच नाही, आज सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 6 / 9सकाळीच कोसळलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचले असून शहरातील ट्रॅफिकही जाम झाले आहे.7 / 9मुंबईसह एक्सप्रेस वेस्टर्न हायवेवरही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ चक्का जाम झाला आहे. 8 / 9शहरासह उपनगरातही पावसाचे आगमन झाल्याने चाकरमान्यांनी पावसात भिजतच मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे9 / 9मुंबई शहरात 28.55 मिमि पावसाची नोंद झाली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरात सरासरी 18 मिमि पावसाची नोंद झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications