Join us

Uddhav Thackeray: भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:08 IST

1 / 9
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत मोठी सभा पार पडली. या सभेत त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं.
2 / 9
आपल्या सभेत केवळ भाजपला फैलावर घेत राज्यातील भाजप नेत्यांवर आणि केंद्र सरकारवर त्यांनी जबरी टिका केली. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान खाली गेल्याचंही त्यांनी म्हटलं.
3 / 9
उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत बोलताना हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आमचं हिुंदत्त्व ह्रदयाद राम आणि हाताला काम देणारं असल्याचं म्हटलं. यावेळी, एका शिवसैनिकाचा उल्लेखही केला.
4 / 9
माझ्यासाठी वह्यांवर श्रीराम-राम लिहत शिवसैनिक सभेला आला, त्याला काय पडलं होतं. पण, तो शिवसेनेला आणि हिंदुत्त्वाला मानणार माझा शिवसैनिक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
5 / 9
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणापूर्वी या शिवसैनिकाची भेटही घेतली. त्यावेळी, त्याने श्रीराम-राम लिहिलेल्या वह्यांचा गठ्ठा मुख्यमंत्र्यांना भेट स्वरुपात दिला.
6 / 9
अंकुश वाहक असं या शिवसैनिकाचे नाव असून, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तब्बल 7 कोटी वेळा श्रीराम-राम असं लिखाण केलं आहे. याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.
7 / 9
एका पुस्तकात 12 हजार 500 वेळा, अशा तब्बल 5 हजार 500 वह्यांचा गठ्ठा घेऊन हा शिवसैनिक अंकुश वाहक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आला होता.
8 / 9
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती.
9 / 9
एका वहीमध्ये 12 हजार पाचशे वेळा, राम राम लिहिणाऱ्या शिवसैनिकाने 5,500 वह्यांमध्ये हे लिखाण केले आहे. विशेष म्हणजे सदरील लिखाण केलेल्या या वह्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना भेट दिल्या.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादHinduismहिंदुइझम