Join us

वसंतरावांनी केली सुरुवात, विलासरावांचा जोर, मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 7:06 PM

1 / 10
मुंबईबाहेर राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेण्याची ही पंरपरा वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना सुरु झाली. पण बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कारकिर्दीत मराठवाड्याला खऱ्या अर्थान भरघोस मदत मिळाली.
2 / 10
तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांनी मराठवाड्यासाठी सर्वप्रथम १४ कलमी कार्यक्रम दिला. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण, निलंगेकर आणि विशेषत: विलासराव देशमुख यांनी मराठवाड्याच्या राजधानीत मंत्रिमंडळ आणून बैठकांचे सत्र सुरु केले.
3 / 10
बैठकीच्या पूर्वसंध्येला विलासराव हे जनता विकास परिषदेचे अध्यक्ष स्व. गोविंदभाई श्रॉफ यांची खास भेट घेत असत. मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून दुसऱ्या दिवशी सकारात्मक निर्णय घेत असत.
4 / 10
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली होती. ४ ऑक्टोबर २०१६ ला मराठवाड्यात शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली होती.
5 / 10
तत्पूर्वी २००८ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात एकदा मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. म्हणजे १६ वर्षात मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या दोनच बैठका झाल्या आहेत.
6 / 10
फडणवीसांच्या नेतृत्त्वात ७ वर्षापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण, ते पूर्ण झालं नाही.
7 / 10
मागील बैठकीत आम्ही ३१ निर्णय घेतले होते. २०१७ मध्ये यातील १० विषय मार्गे लागले होते. तर आज घडीला यातील २३ विषय मार्गे लागली असून, ७ विषय प्रगतीपथावर असल्याचं फडणवीस म्हणाले.
8 / 10
नवीन योजनेनुसार मराठवाड्याला जायकवाडीचं पाणी देऊ, असं अश्वासन होतं. पण शहराला पूर्वी दोन दिवसांआड नळाला पाणी यायचं, तर आता ७ दिवसांनी पाणी येतंय.
9 / 10
तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.
10 / 10
यावेळच्या बैठकीत एकूण ५९ हजार रुपयांच्या पॅकेजचही घोषणा करण्यात आलीय. त्यामध्ये, जलसिंचन हाच मुद्दा केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतय. त्यामध्ये, १४ हजार कोटींची सुप्रमा आहे.
टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईकChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस