Join us

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर कालवश

By admin | Published: December 30, 2015 12:00 AM

1 / 12
जिप्सी सलाम धारानृत्य उदासबोध त्रिवेणी कबीर मोरू सूरदास कविता माणसाच्या माणसासाठी असे अनेक कवितासंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा होती.
2 / 12
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? सलाम सावर रे सावर रे उंच उंच झुला जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं सांगा कसं जगायचं या त्यांच्या काही गाजलेल्या कविता.
3 / 12
शोध कवितांचा या पुस्तकातून त्यांनी कविता लेखनाचे अनुभव लिहीले.
4 / 12
पाडगावकरांनी मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद केलेला मीरा काव्यसंग्रह १९६५ मध्ये प्रकाशित झाला. शेक्सपियरच्या प्रसिध्द नाटकांचेही त्यांनी मराठीत भाषांतर केले.
5 / 12
कोकणात जन्म झालेल्यया पाडगावकर यांनी वयाच्या १४ व्या वर्षी कविता लेखनाला सुरुवात केली.
6 / 12
सलाम या कवितासंग्रहासाठी १९८० साली पाडगावकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर २००८ मध्ये राज्याच्या सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी २०१३ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
7 / 12
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
8 / 12
लोकमत
9 / 12
लोकमतच्या हास्यकवी संमेलनात ( ३ जानेवारी २००७ ) कविता सादर करताना ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर.
10 / 12
दैनिक लोकमत औरंगाबादच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ३ जानेवारी २००७ साली आयोजित करण्यात आलेल्या हास्य कवी संमेलनादरम्यान मंगेश पाडगावकर यांचा लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
11 / 12
सहज सोप्या भाषेतील जगण्याची प्रेरणा देणा-या कवितांमधून पाडगावकरांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले.
12 / 12
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे सांगत रसिकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मराठीतील महान कवी आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे बुधवार ३० डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.