PHOTOS: विधानभवनातील राड्याचे हे फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, 'यासाठी निवडून दिलं होतं का?' By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:14 PM1 / 11राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. (छाया- दत्ता खेडेकर)2 / 11विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनं याआधीही केली जात होती. यात काही नवी बाब नाही. पण आज चक्क सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडून गेल्या दोन दिवसांपासून केल्या जात असलेल्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यसाठी निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. (छाया- दत्ता खेडेकर)3 / 11विधानभवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दीक बाचाबाजी झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं. (छाया- दत्ता खेडेकर)4 / 11गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. (छाया- दत्ता खेडेकर) 5 / 11कोविड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. (छाया- दत्ता खेडेकर)6 / 11मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.(छाया- दत्ता खेडेकर)7 / 11'आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ', असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले. (छाया- दत्ता खेडेकर)8 / 11'आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ', असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले. (छाया- दत्ता खेडेकर)9 / 11'आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ', असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले. (छाया- दत्ता खेडेकर)10 / 11'आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ', असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले. (छाया- दत्ता खेडेकर)11 / 11'आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ', असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले. (छाया- दत्ता खेडेकर) आणखी वाचा Subscribe to Notifications