इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे मुंबईत मऱ्हाठमोळं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:30 IST
1 / 6मुंबईतील यहुदी समाजाची भेट घेण्यासह बॉलिवूडला जवळून पाहण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून गुरुवारी (18 जानेवारी) मुंबई दौ-यावर आहेत. 2 / 6गुजरात दौरा बुधवारी (17 जानेवारी) पूर्ण केल्यानंतर, संध्याकाळी ते मुंबईला पोहोचले. 3 / 6मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे मराठमोळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आले.4 / 6नेतान्याहू यांच्या भोजनाची व्यवस्था खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. 5 / 6मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक ठिकाण असलेल्या नरिमन हाऊस येथील छाबड सेंटरलाही नेतान्याहू भेट देणार आहेत. सोबत ते 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. 6 / 6छाबड सेंटरमध्ये उभारलेल्या संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.