What to do with this price hike, Rohit Pawar's question after hitting a century
या दरवाढीचं करायचं काय?, शतक ठोकल्यानंतर रोहित पवारांचा सवाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:26 PM1 / 12आठवडाभरात पाचव्यांदा झालेल्या दरवाढीनंतर सोमवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही आता पेट्रोल १०० रुपये लिटरच्या वर गेले आहे.2 / 12सरकारी तेल वितरण कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात २६ पैशांची, तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ केली आहे. पाच राज्ये-केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली होती. 3 / 12४ मे रोजी ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासूनची ही पाचवी दरवाढ ठरली आहे. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.५३ रुपये लिटर, तर डिझेल ८२.०६ रुपये लिटर झाले आहे. 4 / 12राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोल काही दिवसांपूर्वीच १०० रुपयांच्या वर गेले होते. सोमवारी महाराष्ट्रातील परभणीत शहरातही शंभरी पार करून पेट्रोल १००.२० रुपये लिटर झाले.5 / 12पेट्रोलने शतक ठोकल्यानंतर देशभरातून नागरिकांसह अनेकजण केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन मोदी सरकारला टोला लगावला. 6 / 12क्रिकेटमध्ये शतक झालं की आपण टाळ्या वाजवून खेळाडूचं अभिनंदन करतो. एखाद्याने वयाची शंभरी पूर्ण केल्यावरही अभिनंदन करतो. 7 / 12आता पेट्रोलच्या दरानेही शंभरी ओलांडली. या दरवाढीचं करायचं काय? कमेंटमध्ये तुम्हीच सांगा!, असा प्रश्न रोहित पवार यांनी नेटीझन्सला विचारला आहे. 8 / 12रोहित पवार यांच्या ट्विटवर आणि फेसबुक पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये, मोदी सरकारचा निषेध करता केंद्र सरकारला ट्रोल करण्यात आलंय. 9 / 12मुंबईत पेट्रोल वाढून ९७.८६ रुपये लिटर तर डिझेल ८९.१७ रुपये लिटर झाले. भोपाळमध्ये ९९.५५ रुपये दरासह पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. 10 / 12राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०२.४२ रुपये लिटर आणि मध्यप्रदेशातील अनुपपूर येथे १०२.१२ रुपये लिटर झाले आहे. 11 / 12देशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील पाच दरवाढींत पेट्रोल १.१४ रुपयांनी, तर डिझेल १.३३ रुपयांनी महागले आहे. 12 / 12मागच्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ केली होती. या करवाढीनंतर सरकारी तेल वितरण कंपन्यांनीही वेळोवेळी दरवाढ करून पेट्रोल २१.५३ रुपयांनी, तर डिझेल १९.१८ रुपयांनी महाग केले. आणखी वाचा Subscribe to Notifications