Join us

काय आहे आरेचा वाद? काय काय घडलं गेल्या 24 तासांत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 3:50 PM

1 / 7
आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
2 / 7
मानवी साखळीच्या माध्यमातून स्थानिक, पर्यावरणप्रेमी झाडं तोडू नका असं आवाहन करत आहेत.
3 / 7
आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका काल (४ फेब्रुवारीवला) न्यायालयानं फेटाळून लावल्या. त्यानंतर संध्याकाळी झाडं तोडण्याचं काम सुरू झालं.
4 / 7
आरेत वृक्षतोड असल्याची माहिती मिळताच स्थानिक, पर्यावरणप्रेमी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृक्षतोडीस विरोध केला.
5 / 7
एका रात्रीत प्रशासनानं आरेमधील जवळपास २०० झाडं कापली.
6 / 7
वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड केली.
7 / 7
आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरे परिसरातील बंदोबस्त वाढवला. त्यानंतर या भागात कलम १४४ लागू करण्यात आलं. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हं आहेत.
टॅग्स :Aarey ColoneyआरेMetroमेट्रो