Which fort would Sambhaji Raje like to live in? sambhajiraje clarify answer
संभाजीराजेंना कोणत्या किल्ल्यावर राहायला आवडेल, खासदारांनी घेतली 2 नावं By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 2:09 PM1 / 11संभाजीराजे नाव घेतलं किंवा ऐकलं तरी मराठा आरक्षण हेच चित्र सध्या आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. राजकारणी, खासदार आणि छत्रपती घराण्याचे वारसदार असलेले मराठा आंदोलकाचे नेते अशीच संभाजीराजेंची प्रतिमा जनमानसांत आहे. 2 / 11लोकमतने संभाजीराजेंची वेगळी कथा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. 3 / 11संभाजीराजेंच्या बालपणापासून, शालेयजीवनापासून ते आजमित्तीस सुरू असलेल्या त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू थेट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. 4 / 11विशेष म्हणजे संभाजीराजेंनीही प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली आहेत. त्यामध्ये, उदयनराजेंबद्दल त्यांनी आपलं मत मांडलं. तसेच, पुत्र युवराज शहाजीराजेंची आवड यांसह संभाजीराजेंचा आवडता मेनूही त्यांनी सांगितला. 5 / 11संभाजीराजेंनी या मुलाखतीत आवडता मेन्यू म्हणजे चिकन मटण थाळी असल्याचं सांगितलं. त्यासोबतच, सुकडी का कोकणातील पदार्थ आवडत असल्याचं ते म्हणाले. 6 / 11मराठा आरक्षणातील काही आठवणी सांगत, संभाजी राजेंनी मी मराठा समाजाचाच नेता असल्याचा टॅग मला पुसून टाकायचाय, असे म्हटले. तसेच, मी मराठा समाजाचा सेवक असून बहुजनांचं नेतृत्व करतो, असेही त्यांनी म्हटलं. 7 / 11सभाजीराजेंनी छत्रपती घराण्यातील संस्कार, शिकवण यावर भाष्य करताना लहानपणी आलेल्या बंधनांपासून ते सध्या कुटुंबात सर्वांनाच असलेलं विचार स्वातंत्र्य इथपर्यंत अनेक बाबींवर चर्चा केली. 8 / 11प्रत्येक किल्ल्यांचं वेगळं महत्त्व आहे, प्रत्येक किल्ल्यांची वेगळी ठेवण आहे. शिवाजी महाराजांनीदेखील परिस्थितीनुसार वेगवेगळ्या किल्ल्यांची निर्मित्ती केली आहे. 9 / 11मला विचाराल तर रायगडला तोड नाहीच. पण, राहण्यासाठी जायचं झालं तर माझ्यासमोर दोन किल्ले दिसतात. एक म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आणि दुसरा म्हणजे राजगड किल्ला. 10 / 11राजगडावरील जो चिलखती तटबंदी आहे. याशिवाय 25 वर्षे शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा किल्ला. शिवाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनंतर छत्रपती घराण्यातील कोण हा किल्ला पायाने चढत गेला असेल तर तो मी आहे. 11 / 11मी 4 ते 5 वेळा या किल्ल्यावर गेलो होतो, तिथं 3-3 दिवस राहिलोय, असे संभाजीराजेंनी लोकमतच्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच, सिंधुदुर्ग किल्ल्याचा थाटच वेगळा, असेही ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications