Who is Tushar Preeti Deshmukh ?, which was mentioned by Ashish Shelar in his speech
कोण आहे तुषार प्रीती देशमुख?; आशिष शेलारांनी ज्याचा उल्लेख करत नवाब मलिकांचा मागितला राजीनामा By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 4:06 PM1 / 10दाऊद इब्राहिमचे संबंध असल्याच्या कारणावरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली. यावेळी भाजप आमदार आशिष शेलारांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या प्रीती देशमुख यांचा उल्लेख करत मृत प्रीती यांचा मुलगा तुषार देशमुख याची व्यासपीठावरून ओळख करून देऊन त्याचा भाषणात उल्लेख केला. (All Photo - Social Media)2 / 10तुषार हा प्रसिद्ध शेफ असून तो सध्या भाजप माहीम विधानसभेच्या कोषाध्यक्ष पदी कार्यरत आहे. तुषारची आई प्रिती देशमुख १९९३ साली मुंबईच्या पेडर रोडवर कॅन्टीन चालवत असतं. बॉंबस्फोटाच्या दिवशी बस पकडून घरी येत असताना बस वरळीच्या सेंच्युरी बाजार बस स्टॉपवर थांबली. त्यावेळी मुंबई बॉम्बस्फोटाने रक्तबंबाळ झाली होती.3 / 10१९९३ बॉम्बस्फोटात आई गेल्याने तुषारने या विरोधात त्याने आवाज उठवायचं ठरवलं. त्यानंतर विविध चॅनेल्स, वृत्तपत्राच्या माध्यमातून दाऊद आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्याने सातत्याने धरून ठेवली. 4 / 10१९९३ बॉम्बस्फोटात आई गेल्याने तुषारने या विरोधात त्याने आवाज उठवायचं ठरवलं. त्यानंतर विविध चॅनेल्स, वृत्तपत्राच्या माध्यमातून दाऊद आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्याने सातत्याने धरून ठेवली. 5 / 10बॉम्बस्फोटात आईचे निधन झाल्यावर वडिलांनी दुसरे लग्न केले. पण सावत्र आईशी तुषारचे पटलेच नाही.नंतर त्याने १० वीनंतर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायला सुरूवात केली. मग त्याची ओळख दादरमध्ये राहणाऱ्या योगेश म्हात्रेशी झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 6 / 10तुषारची आई कँटीन चालवत असे, आपल्या मुलाने शेफ व्हावे असे तुषारच्या आईला वाटायचे. त्याप्रमाणे त्याने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. तो विविध कार्यक्रमांमधून आपल्या रेसिपीज दाखवत असतो. लहान मुलांना पदार्थ बनवायला शिकवतो. तसेच तुषारची पाककलेचे पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे.7 / 10१९९३च्या बॉम्बस्फोटात सेंच्युरी बाजारकडे झालेल्या स्फोटात तुषारच्या आईचा मृत्यू झाला, तेव्हा तुषार १० वर्षांचा होता. आई गेल्याच्या दु:खातून सावरायला तुषार बराच काळ लोटला. त्यावेळी त्याला साथ दिली ती त्याचा शाळेतील मित्र योगेश म्हात्रे याने. 8 / 10 योगेशच्या घरी जाणे, त्याच्या आईशी गप्पा मारणे, तिच्या हातचे पदार्थ खाणे त्याला आवडू लागले. त्या घराचा त्याला लळा लागला. योगेशने आई नीना म्हात्रे हिला तुषार आपल्याकडे कायमचा राहू देत का असे विचारले आणि त्यास नीना यांनी होकार दिला. गेली ३० वर्ष तुषार आजतागायत या म्हात्रे कुटूंबाबरोबरच राहतो आहे.9 / 10त्याचे या कुटूंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. तुषारसाठी नीना म्हात्रे यांनी सख्या मुलाप्रमाणे प्रेम केले आहे. तुषारला आईची माया नीना यांनी दिली. 10 / 10तुषार आणि योगेश या दोन जिवलग मित्रांनी माया ऑटो कार नावाने व्यवसाय सुरु केला असून तो अनेक वर्षांपासून सुरु आहे. तुषार देखील म्हात्रे कुटुंबातील एक सदस्य बनला आहे. स्वतःच्या आईचे छत्र तुषारचे हरपले असले तरी देवाने नीना यांच्या रूपाने दुसरी माउली तुषारच्या नशिबी घातली हे खरं. आणखी वाचा Subscribe to Notifications