Who is Riyaz Bhati? Direct connection with the Sachin Vaze case; Nawab Malik allegation Fadnavis
Riyaz Bhati: कोण आहे रियाज भाटी? सचिन वाझे प्रकरणाशी थेट कनेक्शन; मलिकांमुळे सरकारची अडचण By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 2:38 PM1 / 10राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन सुरु असलेलं राजकारण आता अंडरवर्ल्डच्या संबंधासोबत पोहचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप लावला आहे. 2 / 10या प्रकरणात नवीन नाव समोर आलंय ते म्हणजे रियाज भाटी. नवाब मलिकांनी रियाज भाटीसोबत असलेल्या संबंधावरुन फडणवीसांना प्रश्न विचारले आहेत. भाजपा नेत्यांसोबत रियाजचे फोटो आहेत. इतकचं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही रियाजचे फोटो असल्याचं मलिकांनी म्हटलं. 3 / 10नवाब मलिकांच्या या आरोपावर पलटवार करताना भाजपाने रियाज भाटीचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मविआच्या अन्य नेत्यांसोबतचे फोटो दाखवले. मग सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो असलेला रियाज भाटी हा नेमका कोण आहे हे जाणून घेऊया.4 / 10रियाज भाटी हा कुख्यात गॅगस्टर आहे. रियाज भाटीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो बांधकाम व्यावसायिक असल्याचे भासवित असला, तरी तो डी गँगशी संबंधित होता. टोळीच्या म्होरक्या व शूटर्सना तो बिल्डरबाबतची माहिती पुरवित असे. खंडणी मागणे, अपहरण करणे, हत्या करणे आदी कटांमध्येही त्याचा सहभाग होता.5 / 10२०१५ आणि २०२० मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करुन तो देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जयपूरमधील रहिवासी असल्याचे भासवून, दुसऱ्या बनावट नावे त्याने पासपोर्ट बनविला होता. या सहाय्याने तो दुबईला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राधिकरणाच्या सहाय्याने सापळा रचून अटक केली.6 / 10जुलैमध्ये गोरेगाव इथं दाखल झालेल्या एका प्रकरणात परमबीर सिंह आणि सचिन वाझे प्रकरणातही रियाज भाटी सहआरोपी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाझेच्या सांगण्यावरुन रियाज भाटी बार आणि रेस्टॉरंटमध्ये वसुली करत होता. हा पैसा तो वाझेला द्यायचा. 7 / 10या प्रकरणात अंतरिम जामीन रियाज भाटीला कोर्टाकडून मिळाला होता. मात्र सप्टेंबरमध्ये तो रद्द करण्यात आला. तरीही रियाज भाटी सध्या फरार आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून रियाज भाटीला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहे.8 / 10आता नवाब मलिकांनी रियाज भाटीचं नाव घेऊन पुन्हा त्याला चर्चेत आणलं आहे. परंतु रियाज भाटी गायब झालाय की त्याला वाचवलं जात आहे? राष्ट्रवादी काँग्रेस रियाज भाटीला कस्टडीत आणण्यापासून वाचवत आहे. रियाज भाटीचं नाव सचिन वाझे प्रकरणात आलं आहे. त्यामुळे रियाज भाटी मुंबई पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणांसमोर आलं तर वसुलीचे आणखी काही नावं फुटतील याची भीती वाटतेय का? असा गंभीर आरोप भाजपाच्या आशिष शेलारांनी केल्यामुळे सरकारदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. 9 / 10फेब्रुवारी २०२० मध्ये रियाज भाटीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. तो सौदी अरेबियाला पळण्याच्या मार्गावर होता. त्याआधी २०१५ मध्येही त्याला एअरपोर्टवरुन पकडण्यात आले होते. तेव्हा तो साऊथ आफ्रिकेला पळणार होता. 10 / 10प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती. या प्रकरणी सचिन वाझेला अटक करण्यात आली. व्यापारी बिमन अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर वाझे प्रकरणात रियाज भाटीला सहआरोपी करण्यात आले. बळजबरी वसुलीचा आरोप त्याच्यावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications