Why did sanjay Raut say 'Ajit Pawar escaped'? on statement of chandrakant patil
'अजित पवार सटकले', संजय राऊत असं का म्हणाले By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 9:01 AM1 / 10शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आता महाराष्ट्राला नवा राहिला नाही. त्यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दीक कलगीतुरा नित्याचाच झाला आहे. 2 / 10दुसरीकडे माजी खासदार किरीट सोमय्यांनी मंत्रिमंडळातील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन वातावरण दणाणून सोडलं आहे. तर, संबंधित मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ते पत्रकार परिषदाही घेत आहेत. 3 / 10शिवसेना भाजपच्या या वादावरुन संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांची 'रोखठोक' खिल्ली उडवली आहे. त्यामध्ये, चंद्रकांत पाटील यांच्या अजित पवारांबद्दलच्या विधानाचाही समाचार घेतला. 4 / 10संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून रोखठोक या सदराखाली चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या आणि भाजपची जोरदार खिल्ली उडवली आहे. 5 / 10महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा, किती मनोरंजन कराल? या मथळ्याखाली राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडल्याचे त्यांनी म्हटलं. 6 / 10माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात, चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. एकंदरीत सगळीच गंमत आहे.', असे राऊत यांनी म्हटले आहे. 7 / 10चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. 8 / 10पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना सुनावले. 9 / 10पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार? 'ईडी'च्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 10 / 10चंद्रकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवणच राऊत यांनी रोखठोक भूमिकेतून करुन दिली आहे. तसेच, पाटील यांची खिल्लीही उडवली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications