Join us

प्रभाकर साईलच्या मृत्यूने आर्यन खान प्रकरणावर परिणाम?; समीर वानखेडेंवरील आरोपांचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 12:54 IST

1 / 8
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. परंतू या कारवाईवर नंतर मोठे खुलासे झाले होते. वानखेडेंनी खंडणी उकळल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात प्रभाकर साईल (Prabhakar Sail) पंच होता. त्याचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
2 / 8
शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रभाकर साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3 / 8
आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने ६० दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू झाल्याने विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
4 / 8
प्रभाकर साईल हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होते. आर्यन खान प्रकरणी प्रभाकर साईल यांनी विविध आरोप केले होते. या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.
5 / 8
एनसीबीने १० कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या,असंही प्रभाकर साईल यांनी सांगितलं होतं. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच २ ऑक्टोबर रोजी ७.३० वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं, असं प्रभाकर साईल म्हणाले होते.
6 / 8
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला होता.
7 / 8
गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली होती.
8 / 8
दरम्यान, प्रभाकर साईल यांनी जो काही दावा केलाय, एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर जो काही आरोप केलाय तो केवळ ऐकीव माहितीवर आधारित आहे, त्याने आपले मत हे न्यायालयात मांडावं असं एनसीबीने म्हटलं होतं. तसेच एनसीबीकडून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोbollywoodबॉलिवूड