Join us

मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीज भेट, महिलांसाठी स्पेशल 100 गाड्या 'बेस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 1:40 PM

1 / 12
मुंबईमधील महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी बेस्टच्या बसमधून सुखद आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने 'लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट' या तत्वावर 100 बसेस 6 नोव्हेंबरपासून सुरू केल्या आहेत.
2 / 12
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकर महिलांना दिलेली ही भाऊबीजेची भेट आहे.
3 / 12
मुंबईकर महिलांनी या बसचा वापर मोठ्या प्रमाणात करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
4 / 12
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेस्ट उपक्रमाकडून 'लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट' बस सेवेचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाला.
5 / 12
यावेळी उप-महापौर सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
6 / 12
या बस सेवेच्या लोकार्पणानंतर महापौर बोलत होत्या. यावेळी महापौर म्हणाल्या की, गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येतात.
7 / 12
गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांसाठी 100 विशेष बस सुरू केल्याने महिला प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. या बसमुळे महिला प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित होणार आहे.
8 / 12
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाऊबीज म्हणून मुंबईकर महिला प्रवाशांना ही दिलेली भेट आहे, असे महापौरांनी म्हटले.
9 / 12
सध्या मुंबईतील विविध भागात या बसेसना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या बेस्ट उप्रक्रमाचे कौतुकही करण्यात येत आहे.
10 / 12
बेस्टच्या या गाड्यांमुळे महिलांची चांगलीच सोय झाली असून गर्दीच्या ठिकाणी होणार त्रास कमी होण्यास मदत होईल.
11 / 12
नवीन 100 एसी बस गाड्यांमुळे वातानुकूलित सफर करण्याचा आनंद महिलांना घेता येईल.
12 / 12
मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात ट्विट करण्यात आले असून महिलांना ही भाऊबीजेची भेट असल्याचे सांगण्यात आलंय.
टॅग्स :BESTबेस्टMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीWomenमहिला