Join us

Pune Election: "महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाहीविरोधात जनतेची भाजपला चपराक"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 1:57 PM

1 / 9
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे.
2 / 9
रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी रविंद्र धंगेकरांचं अभिनंदन केलंय.
3 / 9
तर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही धंगेकर हा जमिनीवर राहून काम करणारा नेता आहे, दैनिक लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा कार्यकर्ता आहे, येथील उमेदवाराची योग्य निवड केल्यानेच हा महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे पवार यांनी म्हटलं.
4 / 9
दरम्यान, कसबा पेठेतील विजयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिलीय. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ट्विट करत कसबा पेठेतील विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
5 / 9
कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचंड मतांनी झालेला विजय हा भाजपाला वाढत्या महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाही विरोधात जनतेने लगावलेली चपराक आहे, असे नाना पटोलेंनी म्हटले. तसेच, समस्त कसब्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानत आमदार रविंद्र धंगेकर यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
6 / 9
रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्विकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे.
7 / 9
त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे.
8 / 9
शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर असल्याचं देखील रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं. तर, धंगेकर यांच्यासाठी कसबा पेठ मतदारसंघात रोड शो घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनीही या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे.
9 / 9
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. कसब्यातील विजयाचं वातावरण हे महाराष्ट्रात आणि देशात कायम राहिल, असे त्यांनी म्हटलं.
टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेPuneपुणेkasba-peth-acकसबा पेठ