Join us

आपल्याला स्वच्छतेची मॅच खेळायची आहे - सचिन तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 4:41 PM

1 / 6
मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी एकाची नाही. दुस-याकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. ही सुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असे आवाहन मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकरांना केले आहे. (छाया - दत्ता खेडेकर)
2 / 6
‘मिशन २४’ अंतर्गत मुंबईतील दुसरी मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या देवनार, गोवंडी विभागासाठी सचिन तेंडुलकर स्वच्छतादूत बनून आला आहेत.
3 / 6
या उपक्रमांतर्गत मुंबई महापालिका, मुंबई फर्स्ट आणि अपनालय या संस्थेमार्फत अशा गलिच्छ वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालय, मलनि:सारण अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (छाया - दत्ता खेडेकर)
4 / 6
मुंबईतील कच-यापासून मुक्ती हवी असेल तर सर्वांनीच आपापल्या परिसराचे स्वच्छतादूत व्हावे, असे आवाहन सचिनने केले. स्वच्छतादूत म्हणून मला जे काही करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासनही दिले. (छाया - दत्ता खेडेकर)
5 / 6
या मिशनची घोषणा आयुक्त अजय मेहता व सचिन तेंडुलकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि.12) केली. (छाया - दत्ता खेडेकर)
6 / 6
‘मिशन २४’मध्ये काय? : मुंबईतील एम पूर्व म्हणजेच शिवाजी नगर, गोवंडी या विभागांतील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मिशन २४ अंतर्गत प्रयत्न होणार आहेत. दोन वर्षांमध्ये या विभागाचा कायापालट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका