ऑनलाइन लोकमत - दिंडोरी (नाशिक), दि. 6 - दिंडोरी तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला असून सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे. अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने प्राथमिक अंदाजानुसार साडेतीन कोटींचे नुकसान झाले होते.आता पुन्हा पाऊस होत असल्याने अजून नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालखेड धरणमधून 158531 क्युसेस ,पुणेगाव धरणातून 1600 तर करंजवन धरणातून 4500 क्युसेस पाणी सोडले आहे. नदीकाठच्या तसेच सर्व नदी नाले काठच्या लोकांनी सावधानता बाळगावी. पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने घालू नये, पुलावरून जाऊ नये ,पुराचे पाण्यात पोहू नये ,सेल्फी काढू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. दिंडोरी कळवण रस्त्यावर स्टेट बॅंकेजवळ पुन्हा पाणी साचले असून अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने गावगावांचा संपर्क तुटला आहे.दिंडोरी तालुका धरणसाठाकरंजवण 94.10 % पालखेड 72.69 % वाघाड 100 % ओझरखेड 67.52% पुणेगाव 84.51 % तिसगाव 67.96 % दिंडोरी तालुका पाऊससकाळी 6 पर्यंत 45.1मिमी तर एकूण 797.1 मिमी. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे.