अमेरिकेच्या CIA वर भारतात झाला जगातील सर्वात रहस्यमय हल्ला; सुपरपॉवर 'हवाना सिंड्रोम'मुळे हतबल By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:00 PM 2021-09-21T16:00:42+5:30 2021-09-21T16:08:21+5:30
The world's most mysterious Havana Syndrome attack on the US CIA in India अमेरिकेच्या या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विलियम बर्न्स या महिन्यात भारतात आले होते. बर्न्स यांना भारतासोबत तालिबान राजवटीवर चर्चा करायची होती. मात्र, त्यांना वेगळ्याच संकटाला तोंड द्यावे लागले. जगातील सर्वात रहस्यमयी हल्ल्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या 'हवाना सिंड्रोम'चा भारतातही हल्ला झाला आहे. 'हवाना सिंड्रोम' (Havana syndrome) हा सावलीप्रमाणे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांचा मागे लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुपरपॉवर अमेरिका त्यासमोर लाचार झाली आहे. (CIA officer reports Havana syndrome symptoms on India trip: Reports)
अमेरिकेच्या या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विलियम बर्न्स या महिन्यात भारतात आले होते. बर्न्स यांना भारतासोबत तालिबान राजवटीवर चर्चा करायची होती. मात्र, त्यांना वेगळ्याच संकटाला तोंड द्यावे लागले. सीआयए पथकातील एका सदस्यावर 'हवाना सिंड्रोम'चा हल्ला झाला आणि त्याला तातडीने अमेरिकेला उपचारासाठी हलवावे लागले.
न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएन ने दिलेल्या वृत्तानुसार सीआयए अधिकाऱ्यांना सातत्याने या वेगळ्यात आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. या वृत्तानंतर विलियम बर्न्स रागाने लाल झाले होते. या रहस्यमयी हवाना सिंड्रोममुळे सीआयएचे 200 हून अधिक अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय आजारी पडले होते.
हवाना सिंड्रोम झालेल्या लोकांना डोके दुखी, उलटी, विसराळूपणा आणि चक्कर येण्यासारखी लक्षणे दिसतात. हा आजार 2016 मध्ये सर्वात पहिल्यांदा क्युबाची राजधानी हवानामध्ये आढळला होता. हवानातील अमेरिकी दुतावासाचे अनेक अधिकारी या आजाराला बळी पडले होते.
यानंतर अमेरिकेने याची चौकशी सुरु केली तेव्हा दुतावासावर लेझर गन ताणल्याचे दिसून आले. हवाना सिंड्रोममुळे अमेरिका आणि कॅनडाचे अधिकारी त्रस्त झाले आहेत. या अधिकाऱ्यांवर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कोलंबिया, रशिया आणि उज्बेकिस्तानसारख्या देशांमध्ये हल्ला झाला आहे.
एवढेच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी व्हिएतनाममध्ये संदिग्ध सापडल्यावर दौरा रद्द केला होता. अमेरिकेने मोठ्या तपासानंतर लेझर शस्त्रांच्या वापरार खुलासा केला होता. या रिपोर्टमध्ये मायक्रोवेव्ह किरणांनी अधिकारी आजारी पडले होते जे लेझर शस्त्रांमधून बाहेर पडतात.
क्युबानंतर चीनमध्येही अमेरिकी एजंटांवर असाच हल्ला झाला होता. चीन आणि रशियाने देखील अशीच तक्रार केली आहे. दुतावासाच्या काही खोल्यांमध्ये अशा प्रकारची समस्या उद्भवत असल्याचे म्हटले होते. अमेरिकेने जेव्हा मोबाईल फोन लोकेशनच्या डेटाचा अभ्यास केला तेव्हा त्य़ा शहरात काही रशियन गुप्तहेर असल्याचे आढळले होते.
हे रशियन गुप्तहेर मायक्रोवेव्ह वेपन कार्यक्रमात काम केलेले होते. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही पुरावे सापडले नव्हते. अमेरिका अजूनही या हवाना सिंड्रोमची चौकशी करत असून या वर्षी अखेरपर्यंत रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.