Bank Holiday Alert: Banks opens only 2 days next week; Find out the April holidays list
Bank Holiday Alert: पुढील आठवड्यात फक्त 2 दिवस बँका सुरु; जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सुट्या... By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:17 PM1 / 13आर्थिक वर्ष समाप्तीला काही दिवस उरले आहेत. या काळात अने कामे बँकांशी निगडीत असल्याने बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. अनेकांचा कर भरायचा आहे, कोणाला कर्ज संपवून १ एप्रिलनंतर पुन्हा कर्ज काढायचे आहे. असे एक ना अनेक कामे पेंडिंग आहेत. ही कामे करण्यासाठी आता आजचा आणि उद्याचा असे दोनच दिवस उरले आहेत. (Bank Holidays in April and March Year End.)2 / 13येता शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुटी असणार आहे. 27 मार्चपासून 4 एप्रिल 2021 पर्यंत केवळ दोम दिवस बँका सुरु राहणार आहेत. उरलेले दिवस बँकांना एकतर सुटी किंवा इयर एन्डींगची कामे असल्याने सामान्य ग्राहकांसाठी बंद असणार आहेत. (Bank holiday April List)3 / 13संपूर्ण देशभरात महिन्याचा चौथा शनिवार आणि होळीच्या (Holi) सणामुळे 27-29 मार्च असे सलग तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) असणार आहेत. फक्त पटन्यामध्ये बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. 31 मार्चला सुटी नसली तरीही बँक कर्मचारी इयर एन्डीन्गमध्ये व्यस्त असल्याने जवळपास सर्व कामे ठप्प असतात. कर्मचारी ग्राहकांच्या कामाकडे जास्त लक्ष देत नाहीत. 4 / 13१ एप्रिलला ताळेबंद असल्याने बँकांचे कामकाज बंदच असेल. 2 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने बँका बंद असतील.5 / 13तीन एप्रिलला सर्व बँका उघडणार असल्या तरीदेखील 4 एप्रिलला रविवार आला आहे. यामुळे बँका बंद असतील. 30 मार्च आणि तीन एप्रिल (शनिवार). या दोन दिवसांतच तुम्हाला घाईघाईत कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.6 / 13याचप्रमाणे पुढचा आठवड्यांमध्ये देखील बँका काही दिवस बंद राहणार आहेत. या सुट्या काही राज्यांपुरत्याच देण्यात आलेल्या आहेत. 7 / 135 एप्रिलला बाबू जगजीवनराम जयंती असल्याने काही राज्यांमध्ये बँकांना सुटी असणार आहे. 8 / 1310 एप्रिलला दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील. 11 एप्रिलला रविवार.9 / 1313 एप्रिलला काही राज्यांमध्ये गुढी पाडवा, तेलगू नववर्ष, नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने बँकांना सुटी असेल. 10 / 1314 एप्रिलला बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. यामुळे बँका बंद राहतील. 11 / 1315 एप्रिलला, गुरुवारी - हिमाचल डे, विशु, बंगाली न्यू ईयर, सरहुल असल्याने संबंधीत राज्यांमध्ये सुटी असेल. 12 / 1318 एप्रिलला, रविवार असल्याने बँकांना सुटी असेल. तर 21 एप्रिलला रामनवमी असल्याने सुटी असणार आहे. 13 / 1324 एप्रिलला चौथा शनिवार आणि 25 एप्रिलला रविवार व महावीर जयंती असल्याने बँका बंद असतील. आणखी वाचा Subscribe to Notifications