शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination : एकच डोस पुरून उरणार, ‘स्पुतनिक लाइट’ पुढील महिन्यात दाखल होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 9:07 AM

1 / 9
आतापर्यंत पाच लसींना भारतात मंजुरी मिळाली असून कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. पुढील महिन्यात ‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस देशात उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात ही लस उपलब्ध असेल.
2 / 9
स्पुतनिक लाइट ही कोणतीही नवीन लस नसून स्पुतनिक व्ही या रशियन बनावटीच्या लसीची पहिली मात्रा आहे.
3 / 9
स्पुतनिक व्ही ही दोन मात्रांची लस आहे. ही लस वेगवेगळ्या व्हायरल व्हेक्टरचा वापर करून तिची निर्मिती करण्यात आली आहे.
4 / 9
स्पुतनिक लाइटच्या निर्मितीसाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी भारतातील पॅनेशिया बायोटेक या कंपनीशी करार केला आहे. पॅनेशिया बायोटेक व रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी स्पुतनिक लाइटच्या वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानी मागितली आहे.
5 / 9
स्पुतनिक लाइट या सिंगल डोस लसीची किंमत ७५० रुपये असेल. तिचा वापर मर्यादित स्वरूपाचा असेल.
6 / 9
सिंगल डोस लसीमुळे लसीकरण झटपट होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत ही लस विषाणूला प्रतिकार करणाऱ्या अँटिजन्सची निर्मिती करू शकत असल्याने ती अधिक उपयुक्त ठरते.
7 / 9
परिणामकारकतेचे पारडे जड असेल तर सिंगल डोस लस पुरेशी ठरते त्यामुळे या प्रकारच्या लसीच्या मंजुरीला कुठेही आडकाठी येता कामा नये, असे मत ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी मांडले आहे.
8 / 9
७९.४% स्पुतनिक लाइट लसीची परिणामकारकता आहे. स्पुतनिक लाइट लस टोचल्यानंतर दहा दिवसांत ४० पट अँटिबॉडीज वाढत असल्याचे चाचण्यांमध्ये निदर्शनास आले.
9 / 9
कोरोना विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती वाढीस लागली. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ही लस साठवता येते. या लसीचे वहन करणेही सोपे आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसrussiaरशियाcorona virusकोरोना वायरस बातम्या