Coronavirus: गरमीच्या दिवसात कोरोना व्हायरस मरतो? जाणून घ्या सत्य! ICMR ने केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 09:23 PM2020-04-16T21:23:37+5:302020-04-16T21:29:39+5:30

देशात कोरोना व्हायरसचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतातील कोरोनामध्ये १२ हजार ७५९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४२० लोकांचा मृत्यू झाला आहे.

काही लोकांचा असा दावा आहे की, तापमान वाढल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेल. मात्र या दाव्याचं आयसीएमआरने खंडन केले आहे.

काही शास्त्रज्ञांचा दावा आहे की, उच्च तापमानात कोरोना विषाणू जिवंत राहू शकत नाही. फ्रान्समधील एका संशोधकांच्या टीमने हा शोध लावला आहे.

तर काही जणांनी दावा केला आहे की, ६० अंश सेल्सियसलाही कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो असं म्हटलं आहे.

मग या दोन्ही दाव्यांचा विचार केला तर ६० अंश सेल्सियस एवढं तापमान उन्हाळ्यातही बाहेरही नसतं आणि माणसाच्या शरीरातही नसतं. हे खरं आहे की, काही विषाणूंमध्ये ऋतूनुसार बदल दिसून येतात पण कोरोनाच्या बाबतीत हे सांगणे आताच्या घडीला कठीण आहे.

सध्या कोरोना व्हायरस जगातील २०० हून अधिक देशात पसरला आहे. प्रत्येक देश कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी लोकांची गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे मुख्य तज्ज्ञ डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी सांगितले की, चीनने ३१ डिसेंबरनंतर भारताला कोरोना विषाणू नावाचा आजार पसरत असल्याचे सांगितले. त्यानंतर देशात खबरदारी म्हणून पावले उचलली गेली.

लोकांचा असा विश्वास आहे की उन्हाळ्याच्या काळात शिंका येताना लहान थेंब लवकर सुकून होतील आणि यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल. जर अशाप्रकारे कोणताही पुरावा मिळाला तर आम्ही त्याबद्दल माहिती जमा करू, परंतु सध्या उन्हाळी हंगामात कोरोना संपुष्टात येईल याचा कोणताही पुरावा नाही असं डॉ. रमन गंगाखेडकर म्हणाले.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे मुख्य तज्ज्ञ डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी सांगितले की, चीनने ३१ डिसेंबरनंतर भारताला कोरोना विषाणू नावाचा आजार पसरत असल्याचे सांगितले. त्यानंतर देशात खबरदारी म्हणून पावले उचलली गेली

आतापर्यंत कोरोना व्हायरसने संपूर्ण उन्हाळी हंगाम पाहिला नाही, त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात या विषाणूचा प्रभाव आणि परिणाम बघितलं जाईल. सध्याच्या काळात हा रोग उन्हाळ्याच्या हंगामात संपेल याचा पुरावा नाही असं गंगाखेडकर यांनी सांगितले.