शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: पहिल्या सॅनिटायझेशन चेंबरची सुरुवात; अवघ्या २० सेकंदात करणार विषाणूचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 12:33 PM

1 / 10
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना विषाणूला मारण्यासाठी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर महानगरपालिकेने चेस्ट हॉस्पिटलच्या गेटवर पहिला सॅनिटायझेशन चेंबर सुरु केला आहे.
2 / 10
अशी आणखी 16 चेंबर्स तयार करण्यात येणार आहेत. यातून प्रवेश करताना सर्व प्रकारचे व्हायरस 20 सेकंदात मारले जाणार आहेत. महापौर जुनैद अजीम मट्टू, उपमहापौर परवेझ कादरी, आयुक्त श्रीनगर महानगरपालिका गजानफर हुसेन यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सीडी रुग्णालयाला भेट देताना हा सॅनिटायझेशन कक्ष सुरू केला.
3 / 10
हे कक्ष सुरू झाल्यावर डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी, रूग्ण आणि इतर परिचारकांना रुग्णालयात प्रवेश करतांना किंवा बाहेर पडताना त्यांची अशाप्रकारे स्वच्छता करण्यात येईल.
4 / 10
त्याशिवाय कोरोना संक्रमित रुग्ण आढळलेल्या सर्व भागात विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे.
5 / 10
मंगळवारी श्रीनगर महानगरपालिकेच्या वतीने सॅनिटायझेशन चेंबरचा प्रायोगिक वापर करण्यात आला. चार तासांचा यशस्वी प्रयोग घेण्यात आला.
6 / 10
चेंबरमध्ये वापरलेले केमिकल बायोडिग्रेडेबल आहे, जे माणसांसाठी सुरक्षित आहे आणि त्रासदायक नाही.
7 / 10
या सॅनिटायझेशन चेंबरमधून जाताना 20 सेकंदांत जवळपास सर्वप्रकारचे व्हायरस मरुन जातात
8 / 10
अशा प्रकारच्या सॅनिटायझेशन चेंबरचा वापर चीनने वुहान शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी केला होता.
9 / 10
कोरोना विषाणूच्या युद्धात या चेंबरच्या माध्यमातून खूप मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
10 / 10
या यशाबरोबरच कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी बूम स्प्रेयरचा देखील वापर केला जाईल. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे खूप अत्याधुनिक आहे. याद्वारे 50 फूट परिसरात प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करता येतील.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या