शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flashback 2015 - बंदीचं वर्ष

By admin | Published: December 25, 2015 12:00 AM

1 / 7
बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवर बंदी - १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कारातील गुन्हेगाराच्या मुलाखतीचा समावेश असलेल्या इंडियाज डॉटर या बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवर नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत बंदी घालण्यात आली. बीबीसीने ही डॉक्युमेंटरी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केली. मुकेश सिंग या नराधमानं बलात्कारासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियाच जबाबदार असल्याचं मुलाखतीत म्हटलं होतं. ही रोगट मनोवृत्ती लोकांसमोर यायला हवी असं निर्मात्यांचं म्हणणं होतं.
2 / 7
बाँडच्या चुंबनाला बंदी - बंदुका गाड्या आणि सुंदरींबरोबरची प्रणयदृष्ये असा मसाला असलेल्या जेम्स बाँडच्या स्पेक्टर या चित्रपटातील ५० टक्के चुंबनदृष्यांवर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आणि जगाला गवसणी घालणा-या बाँडला भारतीय हिसका दाखवला.
3 / 7
अश्लील शब्दांना कात्री - सिनेमामध्ये नट नट्यांच्या तोंडी कुठले शब्द असू नयेत याची यादीच कस वर्डच्या नावाखाली सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि खमंग डायलॉग्सचा वापर करणा-या सिनेनिर्मात्यांच्या तोंडचं पाणी पळालं.
4 / 7
गोवंशहत्या बंदी - आधीपासून गोहत्या बंदी असताना महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांनी गोवंशहत्या बंदी लागू केली आणि स्वस्त बीफला आम जनता मुकली. मोठ्या प्रमाणावर या निर्णयाला विरोध झाला परंतु भाजपा सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता तर देशभरात बीफ हा विषय अत्यंत संवेदनशील होऊन बसला आहे.
5 / 7
अॅडल्ट सिनेमे बंद - फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे सारख्या सिनेमावर बंदी घातल्यानंतर मोदी सरकारनं इंटरनेटवरील पोर्नोसाईट्सवर बंदीचा बडगा उगारला. देशभरातून या निर्णयावर टीका झाली आणि लोकं त्यांच्या बेडरुममध्ये असताना कम्प्युटरवर काय बघतात यात सरकारला डोकावण्याची गरज काय असा सवाल न्यायालयांनी विचारला तेव्हा कुठे ही बंदी उठली.
6 / 7
मॅगी बंद - सर्वसामान्यांचं दोन मिनिटात तयार होणारं आवडतं खाद्य म्हणजे मॅगी नूडल्स होतं. उत्तर प्रदेशमध्ये चाचणीमध्ये असं आढळलं की मॅगीमध्ये शरीराला घातक द्रव्यांचं प्रमाण खूप आहे. बघता बघता मॅगीवरील बंदीचं लोण देशभरात पसरलं आणि मॅगी स्वयंपाकघरातून सध्यातरी हद्दपार झाली.
7 / 7
भारत पाकिस्तान क्रिकेट बंद - भारत सरकारनं अधिकृतपणे पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यावर बंदी घातली नसली तरी बीसीसीआयच्या डिसेंबरमध्ये श्रीलंकेमध्ये पाकिस्तानशी खेळण्याच्या प्रस्तावावर निर्णयच घेतला नाही परिणामी ही मालिका झाली नाही आणि ती एक अघोषित बंदीच ठरली. २००७ नंतर हे पारंपरिक शत्रू एकमेकांशी कसोटी मालिका खेळलेले नाहीत.