शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटांनी दिलेल्या क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनरचं सिंगापूरहून उड्डाण, भारतात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 12:08 PM

1 / 12
देशातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 12
दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी गेल्या दोन दिवसात जवळपास 50 जणांनी आपला जीव गमावला आहे. देशात ऑक्सिजनचे उत्पादन आहे. पण, पुरवठा यंत्रणा कमी पडत आहे.
3 / 12
अशा परिस्थितीत आता देशातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हवाई दलाने कंबर कसली असून IAF च्या विमानांनी देशभर ऑक्सिजनची वाहतूक सुरू केलीय.
4 / 12
देशातील कोरोना विरोधातल्या लढाईत आता भारतीय हवाई दल (IAF) आणि नौदलही उतरलं असून ते देशातील ऑक्सिजन आणि इतर साहित्यांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत.
5 / 12
शनिवारी IAF च्या C-17 विमानाने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे मोकळे टँकर आणि कन्टेनर घेऊन सिंगापूरकडे उड्डाण केलं होतं.
6 / 12
त्या ठिकाणी ऑक्सिजन भरून हवाई दलाचे हे विमान संध्याकाळी 4.30 वाजता पश्चिम बंगालच्या पानागढ एयरबेसवर पोहोचलं. आता त्या टॅन्करमधील ऑक्सिजन देशभरात वितरीत केलं जात आहे.
7 / 12
देशात रोज तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातच अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
8 / 12
अशा परिस्थितीत आता हवाई दलाने पुढाकार घेतला असून देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनची पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
9 / 12
टाटा ग्रुपनेही 24 क्राइजोनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय घेतला होता. या कंटनेर्सच्या सहाय्याने ऑक्सिजन पुरवठा भारतात सुरळीत केला जाईल.
10 / 12
टाटा ग्रुपने देशासाठी डोनेट केलेले हे क्रायोजेनिक कंटेनर सिंगापूरहून भारतात आणले आहेत. या कंटेनरचा वापर लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीकरता करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील ऑक्सिजनच्या कमरतेवर मात करणे शक्य होणार आहे.
11 / 12
देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे.
12 / 12
सिंगापूर इन इंडिया आणि इंडिया इनं सिंगापूर या दोन्ही ट्विटर अकाऊंटवरुन या टँकर उड्डाणाचे फोटो आणि माहिती शेअर करण्यात आली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsingaporeसिंगापूरindian air forceभारतीय हवाई दलTataटाटा