शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ ३०० रुपये महिना भाड्याने मिळणार फ्लॅट; काँग्रेस सरकारची अनोखी स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 3:43 PM

1 / 8
जर तुम्हाला स्वस्त भाड्यात फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही सरकारी फ्लॅट सहज भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त ३०० रुपये भाडे द्यावे लागेल. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारने दरमहा ३०० रुपये भाड्याने सरकारी निवासस्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 8
परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले हे फ्लॅट असतील आणि भाडे करार देखील अशा प्रकारे तयार केला जाईल की भाडेकरू १० वर्षांनंतर मालमत्तेचा मालक होईल आणि त्याच्या सध्याच्या किमतीची शिल्लक रक्कम देता येईल.
3 / 8
मनी९ च्या अहवालानुसार, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे वार्षिक उत्पन्न ३,००,००० रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे, कारण केवळ ३ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबेच या योजनेसाठी पात्र आहेत.
4 / 8
परवडणाऱ्या घरांच्या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या मालमत्ता अनेक वर्षांपासून रिकाम्या पडून आहेत. त्यांचा उपयोग करून राजस्थानमधील दुर्बल घटकांची सेवा करण्याची योजना आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही योजना अंमलात आणली आहे.
5 / 8
शहरी आणि गृहनिर्माण (UHD) विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जयपूरमध्ये बहुमजली इमारतींमध्ये (ग्राऊंड + तीन मजली) अशा ७००० पेक्षा जास्त १ BHK फ्लॅट्स रिकामे आहेत आणि आणखी १४००० फ्लॅट्स इतर सात शहरांमध्ये रिकामे आहेत.
6 / 8
राज्यात अजमेर आणि अलवर जिल्ह्यांमध्ये अशा रिकाम्या मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहेत. सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संबंधित नागरी संस्थांकडून रस्ते, वीज, पाणी इत्यादी सर्व मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
7 / 8
मात्र, ग्राहकांना वापरानुसार पाणी व वीज बिलाचा भार उचलावा लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही घरे दिली जातील. या योजनेचा अतिरिक्त फायदा असा की जर कुणी मालमत्तेच्या सध्याच्या किमतीची शिल्लक रक्कम भरली तर त्यांना १० वर्षांनंतर फ्लॅट खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल.
8 / 8
याचा अर्थ असा की त्यांचे १० वर्षांसाठी दिलेले भाडे व्याजमुक्त मुद्दल मानले जाईल. या युनिट्सची सध्याची किंमत ४ लाख ते ५ लाख रुपये आहे. १० वर्षांसाठी ३०० रुपये भाडे ३६००० रुपये होईल असं एका अधिकाऱ्याने सांगितले.
टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान