india buy russian t 90ms tagil tanks know his features
भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढणार, T-90 MS रणगाडे दाखल होणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 9:22 PM1 / 6भारताच्या ताफ्यात लवकरच T-90 MS रणगाडे दाखल होणार आहेत. भारताने रशियाकडून T-90 MS बनावटीचे 464 रणगाडे खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्रानं 13,500 कोटींच्या या संरक्षण व्यवहाराला मान्यता दिली आहे. 2 / 6T-90MS रणगाडे हे रात्रीच्या अंधारातही शत्रूला अचूक हेरून हल्ला करू शकतात.T-90MS रणगाडे एका जागेहून दुसऱ्या जागी सहजगत्या नेता येतात. 3 / 6नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाणार आहे. 4 / 6भारताकडे सध्या T-90 या प्रकारातले जवळपास 1650 रणगाडे आहेत. नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाणार आहे. 5 / 6भारताच्या लष्करात T-90 आणि T-72 हे दोन प्रकारचे रणगाडे असून, मेक इन इंडियांतर्गत नवे रणगाडे बनवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 6 / 6रशियाकडून खरेदी करण्यात येणारे रणगाडे हे T-90 या प्रकारातलेच अद्ययावत करण्यात आलेले रणगाडे असणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications