Landing in Dharoi dam of Narendra Modi's Sea Plane
नरेंद्र मोदींच्या सी-प्लेनचे धारोई धरणात लँडिंग By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 10:37 PM1 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरातमधल्या धारोई धरणात पहिल्यांदाच सी-प्लेन उतरले आहे. 2 / 7मोदी रस्ते मार्गाने अंबाजी मंदिरात दर्शनासाठी निघाले असताना अहमदाबादच्या साबरमती नदीमधून सी प्लेनने धारोईला उतरले होते.3 / 7जलमार्ग विकसित करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते लक्षात आणून देणे हा मोदींचा सी प्लेन प्रवासामागचा उद्देश आहे.4 / 7प्रत्येक ठिकाणी विमानतळ उपलब्ध होऊ शकत नसल्यानं सरकारने सी प्लेन मार्ग विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे मोदी म्हणाले. 5 / 7क्वेस्ट कोडियाक प्रकारचे हे सी प्लेन आहे. एकाच वेळी 9 ते 15 जण या विमानातून प्रवास करू शकतात. 6 / 7उड्डाण आणि लँडिंगसाठी या विमानाला फक्त 300 मीटरची धावपट्टी लागते. 7 / 7विमान पाण्यावर तरंगूही शकते त्यामुळे हे विमान पाण्यातून उड्डाण आणि लँडिंग करू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications