शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आसाममध्ये पावसाचा कहर; भूस्खलनामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:20 PM

1 / 8
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे आसाममध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.
2 / 8
राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
3 / 8
मृत व्यक्ती हे प्रामुख्याने दक्षिण आसाममधील बराक घाट भागातील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. मदत व बचाव कार्य प्रगतीपथावर आहे.
4 / 8
भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कछार जिल्ह्यातील सात, हैलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.
5 / 8
या तीन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मंगळवारी बराक घाट येथे भूस्खलन झाले आणि त्यात २० लोकांचा मृत्यू झाला.
6 / 8
आसाममधील नागरिकांना आधीच पुराचा फटका बसला आहे आणि सुमारे ३.७२ लाख लोक प्रभावित आहेत.
7 / 8
अनेकांनी शिबिरात आश्रय घेतला आहे. या पुराचा सर्वाधिक परिणाम गोलपारा जिल्ह्यात झाला आहे.
8 / 8
त्याचबरोबर, नागाव आणि होजाई जिल्ह्यातही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ३४८ गावे पूरामुळे जलमय झाली आहेत.
टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसाम