Next Station Banaras ... PM narendra Modi visited the railway station at midnight
PHOTOS : Next Station बनारस... PM मोदींची मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर भ्रमंती By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 8:49 AM1 / 11भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली. 2 / 11या शहराचे महात्म्य आजही कायम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. 3 / 11काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाच लाख चौरस मीटर परिसरात विस्तारलेल्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी थाटात उद्घाटन झाले. 4 / 11वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा विकास करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या मनात होता. त्याची स्वप्नपूर्ती सोमवारी झाली. 5 / 11काशीतील कॉरिडोअरचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यरात्री बनारस स्टेशनला भेट दिली. यावेळी, स्टेशनवर मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. 6 / 11मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बनारस रेल्वे स्टेशनवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोदींसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही दिसत आहेत.7 / 11थंडीचे दिवस असल्याने मोदींनी मफलर आणि स्वेटर परिधान केल्याचे येथील फोटोमध्ये दिसून येत आहे8 / 11मध्यरात्री 1.13 मिनिटांनी मोदींनी योगींसह बनारस स्टेशनला भेट दिली. यावेळी, येथील परिसराची पाहणी करतानाच स्टेशनवरील व्यापाऱ्यांशी संवादही साधला9 / 11मोदींच्या बनारस स्टेशनवरील दौऱ्यामुळे येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कमांडो आणि पोलीस फौजफाटा घेऊन मोदींनी स्टेशन परिसरात भ्रमंती केली10 / 11तत्पूर्वी मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणनितीवरही चर्चा झाल्याचे समजते11 / 11मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सुमारे तीन हजार निमंत्रित काशीतील कॉरिडोअरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. आणखी वाचा Subscribe to Notifications