नितीश यांच्या जदयूची भाजपाप्रणीत एनडीएमध्ये 'घरवापसी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 03:46 PM2017-08-19T15:46:32+5:302017-08-19T15:52:56+5:30

नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने अखेर चारवर्षांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश केला.

भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव म्हणून जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी दोन दशकापासूनची भाजपाबरोबरची युती तोडली होती.

धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर नितीश यांनी त्यावेळी भाजपाबरोबरची आघाडी तोडली होती.

लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश यांनी महागठबंधनची साथ सोडून पुन्हा भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.