शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : "कोरोना लस घेतल्यावरही ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटने संक्रमित होताहेत लोक; वेळीच व्हा सावध"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:22 PM

1 / 12
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,706 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे देशभरात तब्बल 5,24,611 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
2 / 12
देशाची कोरोना महामारीपासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. जिथे लोकांना कोरोना संसर्गापासून थोडासा दिलासा मिळाला होता, तिथे आता ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सर्व प्रकारांनी लोकांना एका नव्या चिंतेत टाकले आहे.
3 / 12
देशात अनेक ठिकाणी BA.4 आणि BA.5 संसर्गाची प्रकरणे पुष्टी झाली आहेत. आरोग्य तज्ञ देखील Omicron च्या उप-प्रकारांवर सतत लक्ष ठेवत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
4 / 12
हिंदुस्तान टाइम्सने ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुण्यातील संशोधकांशी संवाद साधला. कारण पुण्यात BA.4 आणि BA.5 ची ही पहिली पुष्टी झालेली केस होती.
5 / 12
बैरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्याकार्टे यांनी सांगितले की, ओमायक्रॉनचे हे सर्व व्हेरिएंट देखील रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देऊ शकतात.
6 / 12
नोंदवलेल्या सर्व प्रकरणांपैकी, फक्त एक मुलाला सोडलं. तर सर्व लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
7 / 12
आपल्याला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि आम्ही रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवून आहोत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
8 / 12
डॉ. कार्यकार्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मुलगा सोडून सर्व सात रुग्णांचे लसीकरण झालेले असूनही त्यांना संसर्ग झाला आहे, याचा अर्थ असा होतो की ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट प्रतिकारशक्तीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात.
9 / 12
एका रुग्णाने बूस्टर डोस देखील घेतला होता, तरीही त्याला ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा संसर्ग झाला. सर्व लोकांना घरात आयसोलेट करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्व लोकांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे होती.
10 / 12
आरोग्य तज्ज्ञ म्हणाले की या सब व्हेरिएंटवरील आंतरराष्ट्रीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की BA.4 आणि BA.5 च्या नवीन प्रकारांमध्ये BA.2 ची वैशिष्ट्ये आहेत आणि इतर प्रकारांपेक्षा अधिक वेगाने प्रसारित करण्याची क्षमता आहे. हे फुफ्फुसांना संक्रमित करण्यास सक्षम आहे.
11 / 12
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटवर अजून संशोधन आणि माहिती गोळा करण्याची गरज आहे जेणेकरुन हे शोधून काढता येईल की हा प्रकार कॉमरेडिटी असलेल्या लोकांवर आणि वृद्ध लोकांवर कशा प्रकारे परिणाम करू शकतो.
12 / 12
देशभरात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. काही राज्यांत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस