On the occasion of the Republic Day,
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर संचलनाची रंगीत तालीम By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 6:21 PM1 / 6नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी लष्कराच्या विविध तुकड्यांमधील जवान सराव करत आहेत.2 / 6दरम्यान, राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका जाणवत असून अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. यातच, नवी दिल्लीचा राजपथ परिसर सध्या जवानांच्या संचलन सरावामुळे बहरुन गेला आहे.3 / 6राजपथावर दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते.4 / 6प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथाच्या पश्चिमेकडील विजय चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत जाते. संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधान देशाच्यावतीने अमर जवान ज्योती येथे शहीद जवानांना आदरांजली वाहतात.5 / 6स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1950 साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले.6 / 6भारतीय संरक्षण दलाचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications