Omicron Variant : ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार?; WHO च्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 8:41 AM1 / 15जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहेय अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 15देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. वेगाने पसरणाऱ्या व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 3 / 15देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील रुग्णांची संख्या ही तीन कोटींच्या वर असून कोरोनामुळे साडे चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 4 / 15भारतातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना कोरोना मृतांचा आकडा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 15ओमायक्रॉन हा असाच वेगाने पसरत राहिला तर भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्यास तो कारणीभूत ठरेल असं म्हटलं जात आहे. यावर आता जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी उत्तर दिलं असून महत्त्वाची माहिती दिली आहे. 6 / 15जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी माहिती दिली आहे. 'नवीन व्हेरिएंट आलाय याचा अर्थ असा नाही की परिस्थिती आणखी वाईट होईल, परंतु परिस्थिती नक्कीच अधिक अनिश्चित असेल' असं म्हटलं आहे. 7 / 15कोरोना नियमावलीचं पालन करा दर त्यामध्ये थोडा जरी निष्काळजीपणा दाखवला तर तो गंभीर समस्येचं कारण ठरू शकतो. कोरोना आणखी जीवघेणा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांना मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 8 / 15'महामारीचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आणि जगाच्या इतर भागांमध्ये वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या यामुळे जागतिक स्तरावर कोरोनाचा धोका कायम आहे.' 9 / 15'विशेषतः दक्षिण आशियामध्ये निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. या भागात कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासह लसीकरण वाढवणे आवश्यक आहे' 10 / 15टीएसीचे अध्यक्ष डॉ एमके सुदर्शन यांनी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट खूप कमी पाहायला मिळत आहे. तसेच नव्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. याचा आधारावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. टेड्रॉस घेब्रेयसेस यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना आता गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर हीच योग्य वेळ आहे अशा शब्दांत त्यांनी जगाला सतर्क केलं आहे.12 / 15जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहाता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर आणखी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.13 / 15ओमायक्रॉनचं जागितक पातळीवर वेगाने पसरणं किंवा 30 हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा कोरोना साथीचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.14 / 15नवा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याचं अनेक संशोधकांचं मत आहे. मात्र, याबाबत डॉ. टेड्रॉस यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी अनेकांना यातून दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.15 / 15कोरोनाचा दीर्घकाळ सामना करणं किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर येणाऱ्या आजारांचा सामना करणं अशा गोष्टी घडू शकतात. आत्ता कुठे आम्हाला ओमायक्रॉनची काही लक्षणं समजू लागली आहेत असं देखील म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications