शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आईला वाटलं, १९७६ च्या मुंबई विमान दुर्घटनेत मुलाचा जीव गेला; ४५ वर्षानं 'तो'च घरी सुखरुप परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 3:26 PM

1 / 7
सज्जाद थंगल ४५ वर्षानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांच्या घरी पुन्हा परतले. त्यांच्या स्वागतासाठी ९२ वर्षीय आई वाट पाहत होती. ही देवाची इच्छा असेल म्हणून माझ्या आयुष्यात हे घडलं. वृद्ध आईची गळाभेट भेटल्यानंतर उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.
2 / 7
थंगल कोल्लम येथील त्यांच्या घरी पोहचले होते. मी नेहमी याच दिवसासाठी प्रार्थना करत होते. अखेर देवाने माझी प्रार्थना ऐकली. तू परत आला. माझ्या मृत्यूपूर्वी तुला पाहण्याची इच्छा होती आणि तेच झालं. मुलाच्या येण्याकडे आस लावून बसलेल्या आईनं मुलाला कडकडून मिठी मारली.
3 / 7
थंगल १९ वर्षाचे असताना १९७२ मध्ये एका जहाजावर काम करण्यासाठी घरातून बाहेर पडले. स्टोअर किपर म्हणून ते त्याठिकाणी काम करत होते. १९७६ मध्ये ते शेवटचं घरी आले त्यानंतर कधीच परतलेच नाही. १९७६ मध्ये मुंबईत झालेल्या विमान दुर्घटनेनंतर थंगल यांचे आयुष्यच बदलले
4 / 7
या दुर्घटनेत प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री राणी चंद्रासह ९५ लोकांचा जीव गेला होता. त्यावेळी मुंबई ते चेन्नई इंडियन एअरलाईन्स विमान दुर्दैवाने टेकऑफ घेताना दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
5 / 7
याच विमान दुर्घटनेत थंगल यांचा मृत्यू झाला असं अनेक लोकांना वाटत होतं. थंगल विमानात होते परंतु ते घडलंच नव्हतं. दुर्घटनेमुळे सज्जन थंगल पूर्णत: मानसिकदृष्ट्या तणावात गेले होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
6 / 7
मागील आठवड्यात एका टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून थंगल जिवंत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. मुंबईच्या पनवेल इथं एक वृद्धाश्रम आहे. त्याठिकाणी थंगल राहत होते. लवकरच त्यांचे नातेवाईक त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आले.
7 / 7
४५ वर्षांनी आई आणि मुलगा पुन्हा आमनेसामने येणार असल्याने १०० हून अधिक गावकरी हे दृश्य पाहण्यासाठी जमलं होतं. थंगल यांचे सर्वच नातेवाईक याठिकाणी हजर होते. हा आनंद इतक्या मोठ्या स्वरुपात साजरा केला गेला की स्थानिक आमदारही कार्यक्रमाला आले होते.