ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 21 - सध्या सर्वत्र डिजिटलायजेशन जमाना आल्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील मोबाईल कंपन्याची रेलचेल सुरु आहे.मोबाईल मार्केटिंगमध्ये टिकून राहण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्या नवनवीन अत्याधुनिक पद्धतीचे मोबाईल बाजारात घेऊन येत आहेत.अशाच जगभरातील काही नावाजलेल्या बिगेस्ट स्मार्टफोन कंपन्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. त्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी टॉप टेनच्या यादीत आहेत. अॅपल - ग्लोबल मार्केटिंगमध्ये स्मार्टफोनमधील किंग म्हणून अॅपल कंपनीकडे पाहिले जाते. ही कंपनी अमेरिकन स्थित असून गेल्या पाच वर्षापासून मोबाईल क्षेत्रात टॉपला आहे. अॅपल कंपनीचा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस हा मोबाईलची सर्वाधिक जास्त विक्री झाल्यामुळे मार्केटमध्ये या कंपनीला मोठे यश मिळविता आले. सॅमसंग - जगभरात मोबाईल मार्केटिंमध्ये दुस-या क्रमांकावर सॅमसंग कंपनीचे नाव आहे. मात्र गेल्या वर्षात या कंपनी थोडा फटका बसला. 2015 च्या तुलेनेत 2016 मध्ये या कंपनीचे मोबईल विक्री प्रमाण तीन टक्क्यांनी कमी झाले. जगभरात या कंपनीने 2015 मध्ये एकूण 320.9 मिलियन स्मार्टफोन विक्रीसाठी पाठविले. तर 2016 मध्ये 311.4 मिलियन स्मार्टफोन पाठविले. सॅमसंग नोट 7 या स्फोटफोनमुळे कंपनीला थोडा फटका बसल्याचे बोलले जाते. मात्र सॅमसंग एस 7 आणि जे सिरिजमधील स्मार्टफोन सर्वाधिक लोकप्रिय ठरले आणि या स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विक्री सुद्धा झाली. ह्युवाई - जगभरातील मोबाईल मार्केटमध्ये तिस-या क्रमांकावर या कंपनी नंबर लागतो. चीन स्थित असलेल्या ह्युवाई या मोबाईल कंपनीने जगभरात तीन महिन्याला 45.4 मिलियन मोबाईल विक्रीसाठी पाठविले आहेत. ओपो - ओपो मोबाईल सध्या भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसतात. सध्या ओपो मोबाईल कंपनी मार्केटमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या कंपनीकडून तीन महिन्याला सरासरी 31.2 मिलियन स्मार्टफोन विक्रीसाठी पाठविले जातात. 2015 मध्ये कंपनीकडून दर तीन महिन्याला 14.4 मिलियन स्मार्टफोन मार्केटमध्ये पाठविण्यात आले आहेत. विवो - आशिया मार्केटमध्ये सध्या ओपोसोबतच विवो सुद्धा अग्रेसर आहे. तसेच, जगभरातील मोबाईल मार्केटमध्ये विवो स्फोर्टफोन पोहचण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. सध्या मोबाईल मार्केटमध्ये ही कंपनी पाचव्या स्थानावर आहे. विवोचे पाच विक्रेत्यांसोबत दर तीन महिन्याला 24.7 मिलियन स्मार्टफोन विक्रीसाठी पाठविले जातात. सर्वाधिक जास्त स्मार्टफोन चीनमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे दिसून आले आहे. वन प्लस - गेल्या काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये वन प्लस या मोबाईल कंपनीचे सेन्टर ओपन करण्यात आहे. मध्यम रेंजचे स्मार्टफोन म्हणून या कंपनीकडे पाहिले जाते. तसेच, फ्लॅगशिप किल्लर्स म्हणून सुद्धा ओळखले जाते. वन प्लस कंपनीचे मुख्यालय चीनमधील शेनझेन येथे आहे. शिओमी - भारतीय स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये शिओमीने 2016 मध्ये पुनरागमन केले. कंपनीने Mi 5 आणि Redmi Note 3 सारखे प्रमुख स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले. तसेच Redmi Note 3 वर ऑफर्स देऊन भारतात चांगल्याप्रकारे या स्मार्टफोनची विक्री करण्यात आली. लेनोवो - जगभरातील मोबाईल मार्केटिंगमध्ये टॉप 5 मध्ये असणा-या लेनोवो स्मार्टफोन कंपनीला गेल्या काही वर्षात फटका बसला. मात्र भारतातील मोबाईल मार्केटमध्ये लेनोवोने चांगला जम बसवलाय. गेल्या काही दिवसांत लेनोवोने जगातील पहिला गुगल टॅन्गोच्या आधारावर स्मार्टफोन लॉन्च केला. लेनोवो ही कंपनी चीन स्थित आहे. एलजी - मोबाईल मार्केटमध्ये एलजी कंपनीने प्रामुख्याने सर्व प्रकारचे स्मार्टफोन आणून सर्वांना आश्चर्यचकीत केले. मात्र कंपनीला म्हणावा तसा रिझर्ल्ट मिळाला नाही. सोनी - भारतासह काही प्रमुख देशामध्ये फक्त प्रीमियम स्मार्टफोन कंपनीने विक्रीसाठी आणले जातील अशी पुष्टी दिली होती. जपानच्या या सोनी मोबाईल कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी Xperia XZ स्मार्टफोन आणला आहे.