शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

YouTubers चं गाव, लहान थोर सगळे करताहेत दणकून कमाई, पंचायतीत ठरते भूमिका, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 6:27 PM

1 / 9
छत्तीसगडमध्ये तर एक असा गाव आहे. जिथे गावातील जवळपास सर्वच ग्रामस्थ हे यूट्युबर आहेत. येथे ५ वर्षांच्या मुलापासून ते ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्व व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्या कलाकारीचं प्रदर्शन घडवत आहेत.
2 / 9
छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून ४० किमी अंतरावर असलेला तुलसी गाव सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे. येथील गल्लीबोळात मुलं खेळतात कमी आणि यूट्युबसाठी कॅमेरे घेऊन अधिक फिरतात. या गावाची लोकसंख्या ३ हजार आहे. तर येथील १ हजारांहून अधिक ग्रामस्थ हे यूट्युबसाठी व्हिडीओ बनवतात. त्यात अभिनय करतात. कॅमेरा लाइट, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटरसारखी कामं करतात.
3 / 9
गावातील पहिला यूट्युबर ज्ञानेंद्र शुक्ला यांची गोष्ट तर फारच कौतुकास्पद आहे. त्यांनी एसबीआयमधील नोकरी सोडल्यानंतर २०१६ मध्ये पहिला यूट्युब चॅनल बनवला होता. तसेच स्थानिक मुद्द्यांवर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली होती. त्याकाळी युट्यूब एवढं पाहिलं जात नसे. त्यानंतर २०१८ मध्ये ज्ञानेंद्र शुक्ल यांनी आपला दुसरा चॅनल सुरू केला. हा चॅनल छत्तीसगडमधील गावागावामध्ये पाहिला जातो. त्यांच्या व्हिडिओंना आता लाखोंच्या संख्येममध्ये ह्युज मिळू लागल्या आहेत. सुरुवातीला गावातील तरुण त्यांच्या चॅनलसाठी काम करायचे. मातर आता गावातील इतर तरुणांनीसुद्धा आपले यूट्युब चॅनल सुरू केले आहेत. तसेच ते क्रिएटिव्ह व्हिडीओ तयार करू लागले आहेत.
4 / 9
ज्ञानेंद्र शुक्ला यांचे सहकारी चेतन नायक यांनी सांगितले की, त्यांचासुद्धा एक यूट्युब चॅनल आहे. त्यावर ते कॉमेडी व्हिडीओ बनवून पोस्ट करतात. तसेच स्थानिक मुद्द्यांवर व्हिडीओ बनवतात. गावातील सगळेजण एकमेकांच्या यूट्युब चॅनलसाठी काम करतात.
5 / 9
तुलसी गावातील ग्रामस्थ यूट्युबसाठी व्हिडीओ तयार करण्यापूर्वी गावातील पंचायतीमध्ये मिटींग घेतात. स्टोरी आयडिया यांच्यावर सगळे मिळून मिसळून व्हिडीओ बनवण्यासाठी चर्चा करतात. तसेच स्टोरीनुसार त्यामध्ये काम कोण करणार हेही ठरवले जाते.
6 / 9
कुठली भूमिका कुणाला द्यायची हे निश्चित झाल्यानंतर गावामध्येच व्हिडीओचं चित्रिकरण केलं जातं. त्यानंतर घरामध्ये हा व्हिडीओ एडिट करून यूट्युबवर पोस्ट केला जातो.
7 / 9
गावामध्ये बरेच कंटेंट क्रिएटर आहेत. कुठली भूमिका कोण चांगली करेल याबाबतही चर्चा होते. महिलासुद्धा घरातील जेवण बनवल्यानंतर यूट्युबवर व्हिडीओ बनवण्यासाठी जातात. फूलटाइम Youtuber ज्ञानेंद्र शुक्ला पत्नीसोबत व्हिडीओ बनवतात. पती-पत्नी व्हिडीओमध्ये विविध भूमिका वठवतात.
8 / 9
ते सांगतात की आम्ही छत्तीसगडमधील स्थानिक सणांवर व्हिडीओ बनवतो. आमच्या गावातील कुणीही काम करू शकतो. कॅरेक्टरची उणीव भासत नाही.
9 / 9
यूट्युबर मनोज कुमार यांनी सांगितलं की, आमच्या गावामध्ये सर्वजण अभिनय करतात. स्क्रिप्ट लिहितात. एकमेकांसोबत मिळून काम करतात. बहुतांशी कॉमे़डी व्हिडीओच अधिक बनवले जातात. माझी दोन मुलंसुद्धा व्हिडीओमध्ये काम करतात, असेही मनोजने सांगितले.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबChhattisgarhछत्तीसगडSocial Mediaसोशल मीडिया