Celebrate Christmas and New Year in Pune in this way
पुण्यात अशाप्रकारे करु शकता ख्रिसमस आणि नववर्षाचं सेलिब्रेशन By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 2:02 PM1 / 7ख्रिसमस व्हॅकेशनमध्ये अनेकजण विविध ठिकाणी जाण्याचा विचार करत असतात. आता सगळीकडेच ख्रिसमिसची तयारी सुरू झालीय. चर्चपासून ते घरापर्यंत सगळीकडे रोषणाई करण्यात येईल. तुम्हीही जर आपल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर पुण्याचा विचार करू शकता2 / 7ख्रिसमसला गेट-टुगेदर करण्याच्या विचारात असाल तर पावना लेकला नक्की भेट द्या. २४ ते २५ डिसेंबर दरम्यान या कॅम्पेनचं आयोजन केलं असून, लाईव्ह म्युझिक, ख्रिसमस पार्टी, टेन्ट स्टे, संगीत खुर्ची, टग ऑफ वॉर असे विविध खेळही तिथं होणार आहेत3 / 7कमी वर्दळीच्या ठिकाणी, चमचमत्या ताऱ्यांच्या प्रकाशात, हिरवळीच्या प्रदेशात तुम्हाला ख्रिसमस साजरा करायचा असेल तर खोपोलीत सिक्रेट वॉटरफॉलजवळ ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. हे कॅम्पेन तुमच्या गेट-टुगेदरसाठीही उत्तम असेल. टेन्टच्या बाजूला शेकोटी पेटवून तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मनसोक्त गप्पा मारू शकाल. मुळातच खोपोलीला एक वेगळं निसर्ग सौंदर्य लाभलंय. त्यातही चांदण्याच्या प्रकाशात निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलतं. 4 / 7पुण्यात ख्रिसमससाठी जाणार असाल तर पुण्यातील सगळ्यात जुन्या चर्चला भेट दिल्याशिवाय ख्रिसमस कसा साजरा होईल. डेक्कनमध्ये सेंट मॅरी चर्च आहे. जवळपास १९१ वर्ष जुनं हे चर्च आहे. रात्री ११ च्या दरम्यान इथं ख्रिसमस मास सुरू होतो. रात्री १.३० वाजेपर्यंत हा मास असतो.5 / 7सेंट्र कॅथड्रल चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन म्हणजे एक सोशल गेटटुगेदरच असतं. जवळपास ४ हजार लोक एकाच वेळी इथं कॅरोलचं गायन करतात. त्यामुळे या चर्चमध्ये ख्रिसमसदरम्यान एक वेगळाच उत्साह दृष्टीस येतो.6 / 7पुण्यातल्या एम.जी रोडवर तुम्ही मनसोक्त ख्रिसमस शॉपिंगचा मजा घेऊ शकता. रात्रभर इथं दुकानं उघडी असतात. एवढंच नाही तर ख्रिसमसनिमित्त खास ऑफर्सही दिली जातात. एम.जी रोड तसा पाहायला गेल्यास फार वर्दळीचा आहे. तसंच हा रस्ता पुण्यातील जुना रस्ता म्हणूनही ओळखला जातो.7 / 7ख्रिसमसच्या दरम्यान भरणारी जत्रा म्हणजे भीमथडी जत्रा. दरवर्षी या जत्रेचं आयोजन केलं जातं. जवळपास २० स्टॉल्स इथं असतात. स्त्रियांनी आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तू इथं प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या जातात. शिवाजी नगरच्या कृषी विद्यापीठाजवळ ही जत्रा भरते. दरवर्षी जवळपास ६ हजाराहून अधिक लोक इथं भेट देतात. तुम्हालाही जरा वेगळ्या पद्धतीची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या जत्रेला भेट देऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications