Due to frequent vacations, the Mumbai-Pune Expressway-wide traffic congestion
सलग सुट्टयांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर प्रचंड वाहतूक कोंडी By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 12:20 PM1 / 4शनिवारी व रविवारला जोडून आलेली सोमवारची नाताळाची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्टया आल्यानं लोणावळ्यासह महबळेश्वर, कोल्हापुर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. (छायाचित्र - विशाल विकारी)2 / 4सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. (छायाचित्र - विशाल विकारी)3 / 4महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून पुण्याकडे येणा-या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. (छायाचित्र - विशाल विकारी)4 / 4चौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस असे सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच लोणावळा शहरातून जाणार्या राष्ट्रीय मार्गावर देखिल वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत. (छायाचित्र - विशाल विकारी) आणखी वाचा Subscribe to Notifications