शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्ट्रीट शॉपिंगसाठी पुण्यातील ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 1:59 PM

1 / 6
माणसांकडे कितीही पैसे असले तरी स्ट्रीट शॉपिंग करण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच मॉलमध्ये येत नाही. म्हणूनच प्रत्येक शहरात गजबजलेली मार्केट असतात.
2 / 6
फर्ग्युसन कॉलेज रोडवर अनेक कपड्यांची दुकानं आहेत. फॅशन विश्वात येणारे नवनवे ट्रेंड तुम्हाला याठिकाणी हमखास मिळतील. रस्त्यावर स्टॉल्स तर आहेतच, पण शॉपिंग सेंटरही असल्याने, स्ट्रिट शॉपिंगपासून ते शोरूम शॉपिंगपर्यंत सगळ्याच शॉपिंगचा तुम्ही इकडे आनंद घेऊ शकता.
3 / 6
कपड्यांव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर वस्तू घ्यायच्या असतील तर हाँग काँग लेन बेस्ट आहे. डेक्कनच्या गरवारे ब्रिजजवळ हाँग काँग लेन आहे. तिकडे तुम्हाला दागिने, पर्स, फुटवेअर यांचे विविध पर्याय मिळू शकतील. फॅशन जगात इन असलेल्या अनेक अॅक्सेसरीजही इकडे मिळतात.
4 / 6
पुणेकरांसाठी हक्काची शॉपिंगची जागा म्हणजे फॅशन स्ट्रीट. मुंबईत ज्याप्रमाणे फॅशन स्ट्रीट आहे, त्याचप्रमाणे पुण्याची ही फॅशन स्ट्रीट. जीन्स,लेगिंग्ज, कुर्ता, दागिने अशा विविध गोष्टींसाठी पुणेकर इकडे येतात. लहान बजेटमध्ये तुम्हाला भरपूर शॉपिंग करायची असेल तर फॅशन स्ट्रीटला एकदा नक्कीच भेट द्या.
5 / 6
तुम्हाला जर फक्त ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याची सवय असेल तर पुण्यातील महात्मा गांधी रोडवरील शॉपिंग स्ट्रीट तुमच्यासाठीच आहे. इकडे अनेक स्टॉल्सवर मोठ मोठ्या ब्रॅण्डचे कपडे, दागिने, कॉस्मेटिक्स मिळतात. ब्युटिकसाठीही महिलामंडळ इकडे येत असतं.
6 / 6
घरगुती सामानांसाठी शॉपिंग करायची असेल तर तुळशी बाग हा एक उत्तम पर्याय आहे. या मार्केटमध्ये जरा जास्तच गजबजाट असतो. गर्दीही अधिक असते. पण तुळशी बागेच्या आसपास राहणारी सगळीच मंडळी इकडे खरेदीसाठी येत असतात.