शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 8:54 PM

1 / 5
पुणे : कोरेगाव भिमा येथील दोन गटातील संघर्षाचे मंगळवारी पुणे शहरातही पडसाद उमटले. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली.
2 / 5
संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि टायर पेटवून निषेध नोंदवला. तर, पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
3 / 5
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
4 / 5
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सायकलचे टायर जाळले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
5 / 5
या बैठकीला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, अजयबाप्पू भोसले, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शैलेंद्र चव्हाण, रमेश राक्षे, रवी आरडे, विकास सातारकर, बाळासाहेब जानराव, राहूल डंबाळे, वसंतराव साळवे, एल. डी. भोसले आदी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे